अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महात्मा फुले,राजर्षी शाहू व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होवून विद्यार्थी दक्षेपासुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे येथील प्रा.एस.के.जोगदंड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सुधाताई जोगदंड यांना दुबई येथे "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत होत आहे.
मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आणि विविध सामाजिक आंदोलनात सक्रिय राहुन कार्य करणारे प्रा.एस.के.जोगदंड यांनी विद्यार्थी असताना आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला.दलित युवक आघाडी, भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास राहिला आहे.अॅड.प्रकाशजी आंबेडकर यांचे विश्वासु सहकार्य म्हणून जोगदंड सर ओळखले जातात.अंबाजोगाई व केज विधानसभा मतदारसंघात गायरान चळवळ,एक गाव-एक पाणवठा,शिष्यवृत्ती वाढ आंदोलन तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ यासह विविध आंदोलनात सामाजिक चळवळीत जोगदंड यांनी आपले योगदान दिले आहे. जिथे सामाजिक अन्याय अत्याचार होतो.त्या ठिकाणी धावून जावून संबंधीतांना सहकार्य व न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.शैक्षणिक क्षेत्रातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे,जोगदंड सर हे सध्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या
कार्यकारिणीत संचालक आहेत. प्रा.माधव मोरे प्रतिष्ठाणचे ते अध्यक्ष आहेत.गेल्या 25 वर्षांपासुन अधिक काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी अंबाजोगाईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यातून विविध चिंतनशिल कार्यकर्त्यांना आणून त्यांची व्याख्यानमाला आयोजित करतात.तर सुधाताई जोगदंड या एक सामाजिक कार्यकर्त्या व बौद्ध धम्म चळवळीत कार्य करणार्या समाजसेविका आहेत.जोगदंड दांपत्याच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार रविवार,दि.2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबई येथे दी मीडिया रोटाना या पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.दुबई स्थित "सायटेक्स डिएमसीसी" या संस्थेमार्फत आणि पुणे येथील स्वयंदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल दिला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 30 नामांकित व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.यशदा येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील पुरस्कार शारजाह येथील राजघराण्यातील शेख सालेम हुमेद सैफ आणि दुबई येथील अजीझ अहमद शेख तसेच सायटेक्स डिएमसीसीचे अध्यक्ष डॉ. भगवान गवई,डॉ.सचिन मांजरेकर,फिल्म निर्माते वासू भागनाणी,ई.झेड.खोब्रागडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा.एस.के.जोगदंड व सुधाताई जोगदंड यांना सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे डॉ. सुरेशराव खुरसाळे,अशोकराव देशमुख,प्रा.नानासाहेब गाठाळ, डॉ.डी.ए.चव्हाण,अॅड.अनंतराव जगतकर,डॉ.श्रीहरी नागरगोजे, लंकेश वैद्य,प्रा.गौतम गायकवाड,सुखदेव भुंबे, भगवानराव ढगे,भागवतराव गायकवाड, प्रा.डी.जी.धाकडे, प्रा.संभाजी बनसोडे,रामराव आडे,प्रा.पी.वाय.फुलवरे,श्रीराम सोनवणे आदींसहीत मित्र परिवार,नातेवाईक व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले.