बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

रेशीमगाठीने नात्यांची वीण घट्ट केली―नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी ; मराठा राज्यस्तरीय वधू- वर,पालक परिचय महामेळावा

मराठा समाजाने काळा बरोबर चालावे-अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― “शेती सोबतच व्यवसाय करणार्‍या मराठा समाजातील कर्तबगार मुलांचे विवाह होण्यासाठी वधु-वर परिचय मेळावे ही काळाची गरज आहे असे सांगून रेशीमगाठीने नात्यांची वीण घट्ट केली” असे प्रतिपादन अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ. रचनाताई मोदी यांनी केले.तर “मराठा समाजात मोठी ताकद आहे.समाज एकदा जागृत झाला.की,मागे हटत नाही. समाजात संस्कारशील पिढी निर्माण झाली पाहीजे.कारण, आजचे युग हे डिजिटल आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करा, मराठा समाजाने काळा बरोबर चालावे,लग्न जमविणे हे एक पवित्र कार्य आहे.असे सांगुन मराठा समाजाला विवाह जुळविणे व ते टिकविण्यासाठी नवा दृष्टीकोन व दिशा देण्याचे काम रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्राने करावे” अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली.

अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, संचलित रेशीमगाठी मराठा वधु- वर सुचक केंद्रामार्फत रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह,नगरपरिषद कार्यालया शेजारी,परळी रोड अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व पालकांचा दुसरा राज्यस्तरीय परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला होता.या महामेळाव्याचे उदघाटन नगराध्यक्षा सौ.रचना सुरेशराव मोदी (अंबाजोगाई) यांच्या हस्ते झाले.तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख (अंबाजोगाई) हे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे,जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे,सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे,सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव काळे,डॉ. प्रल्हाद गुरव,डॉ.राजेश इंगोले, प्रतापराव पवार,अॅड.अजय बुरांडे,महामेळाव्याचे संयोजक भरतराव पतंगे,अरूणराव काळे रघुनाथराव जगताप,दत्ताञय कदम,सदाशिवराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजमाता जिजाऊ, छञपती शिवराय व आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमापुजन, अभिवादन व दीपप्रज्ज्वलनाने तसेच गायक सुभाष शेप,गायक आसाराम जोशी,गायिका मंजुषा देशपांडे यांनी गायिलेल्या जिजाऊ वंदना,स्वागतपर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.त्यानंतर रेशिमगाठी मराठा वधु-वर सुचक केंद्रामार्फत मान्यवरांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना संयोजक भरतराव पतंगे म्हणाले की, “छञपती राजर्षी शाहु महाराज सेवाभावी संस्थेच्या रेशीमगाठी मराठा वधु-वर सुचक केंद्रामार्फत होत असलेल्या दुस-या राज्यस्तरीय मेळाव्यास आपण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार मानले.दोन वर्षांपुर्वी रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्र आम्ही सामाजिक बांधिलकी समोर ठेवून सुरू केले.मराठा समाजाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले,शुभेच्छा दिल्या व सहकार्याचा हात पुढे केला.त्यांच्या या सहकार्यामुळेच हा उपक्रम आज साजरा होत आहे.मराठा समाजातील विवाह सोहळे हे अति थाटमाट न करता साधेपणाने,कमी खर्चात साजरे व्हावेत.लग्नावरील खर्च कमी व्हावा अशी लोकभावना आहे. शेतकरी कुटुंबात आपल्या मुली देण्यास मुलींचे पालक तयार नाहीत.खुप शिकुन मोठे झालेले मराठा समाजातील मुले हे शेतीपासुन दुर गेले आहेत.शेती ही नाही आणि नौकरीही नाही अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांच्या विवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रश्नावर संवादाच्या माध्यमातून उत्तर मिळावे इच्छुक वराला चांगली वधु मिळावी व चांगल्या उपवर वधुला कर्तबगार वर मिळावा मग,तो वर शेती करणारा,स्वतःचा व्यवसाय करणारा प्रसंगी नौकरी करणारा असावा.हीच भूमिका व विधायक हेतु ठेवून रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्र काम करत आहे” अशी माहीती भरतराव पतंगे यांनी दिली.यावेळी बजरंगबप्पा सोनवणे यांनी पुणे -मुंबईच्या धर्तीवर अंबाजोगाईत वधु-वर परिचय केंद्राच्या माध्यमातून हा महामेळावा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.विवाह जुळविणे ही अवघड बाब असल्याचे सांगुन मराठा समाजात मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे.तर मुलांचा खालावला आहे.त्यामुळे लग्न जमवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस लग्नावर वाढणारा खर्च हा वधु पित्याला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे.तेव्हा समाजाने विवाहावरील खर्च कमी करावा असे आवाहन सोनवणे यांनी केले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे,
सुप्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद गुरव,सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले,अॅड.अजय बुरांडे आदींनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे हस्ते “रेशीमगाठी वधू-वर परिचय पुस्तिकेचे” विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचालन ज्योती शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार दत्ताञय कदम यांनी मानले.या महामेळाव्यात 250 नियोजित वधु-वर यांनी नोंदणी केली. तसेच त्यांचा परिचय,पालकांची ओळख व वधु-वर यांच्या परिचयपञाचे (बायोडाटा) अदान-प्रदान करण्यात आले. महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्या गठन करण्यात आल्या होत्या.राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू-वर व पालक परिचय महामेळाव्यास मराठा समाज बांधव,वधु-वर यांचे पालक,महिला भगिनी, इच्छुक वधु-वर,मराठा समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू-वर व पालक परिचय महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी रेशिमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष),अरूणराव काळे (उपाध्यक्ष),गणेश पतंगे (सचिव),रघुनाथराव जगताप (सहसचिव),दत्ताञय कदम (कार्याध्यक्ष),सदाशिवराव सोनवणे (सदस्य),रामकिशन बडे (सदस्य),अमित पतंगे तसेच सकळ मराठा समाज बांधव, मराठा सेवा संघ,मराठा महासंघ, संध्या मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला.