अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

भारत बुद्धमय होण्यासाठी निर्मळ मनाने धम्माचे आचरण करा―पु.भन्ते उपगुप्त महाथेरो

तथागत गौतम बुद्धांनी समतेची शिकवण दिली- आ.संजयभाऊ दौंड

बुद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याची आदर्श पद्धत -शिवकन्याताई सिरसाट

चांदापुर (ता.परळी) येथे सहाव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी सहाव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित उपासक व उपासिकांना धम्म देसना देताना पु.भन्ते उपगुप्त महाथेरो यांनी सकारात्मक असणे हे बौद्ध माणसाचे लक्षण आहे.अंधश्रद्धा दुर करून बुद्ध व बाबासाहेबांना जवळ करा.धम्म कार्य हे त्यागी व झपाटलेल्या लोकांचे कार्य आहे.चांदापुर येथील होत असलेली सहावी धम्म परिषद ही राजेंद्र घोडके व जगन सरवदे यांच्या सारख्या धम्म प्रेमी लोकांमुळेच होत असल्याचे सांगत बुद्धाचा धम्म हा संकुचित नाही तर तो सर्व व्यापक आहे.जगभर धम्माचे उपासक आहेत.विविध जातीतील व धर्मातील लोक बुद्ध धम्मात येत आहेत.माणसाचा दर्जा हा चारित्र्यावर अवलंबून असतो म्हणून चारिञ्य कमवावे लागते.समाजात पद,पैसा, प्रतिष्ठेसाठी सर्वञ संघर्ष होतोय.
डोळ्यांतून पाणी व शरीरातून रक्त येतेय.अशा काळात जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुध्द धम्म हाच एक पर्याय आहे.
भारत बुद्धमय होण्यासाठी निर्मळ मनाने धम्माचे आचरण करा असे धम्म विचार पु.भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांनी व्यक्त केले.

तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे शनिवार, दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी सहाव्या बौद्धधम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे संपन्न झालेल्या सहाव्या धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने झाली.या धम्म परिषदेला धम्मपीठावर पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर), पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली) आणि आ.संजयभाऊ दौंड,माजी मंञी अॅड.पंडीतराव दौंड,माजी आ.पृथ्वीराज साठे, धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्षा बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट, परिषदेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. अनंतराव जगतकर (अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी) तसेच संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे,परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव,नालंदा आकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,उपसरपंच श्रीहरी गित्ते,प्रा.डॉ.विनोद जगतकर, परळी न.प.चे स्वच्छता समितीचे सभापती किशोर पारधे,स्वच्छता निरिक्षक शंकर साळवे,नगरसेवक नितीन रोडे,नगरसेवक दत्ता सावंत (परळी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.प्रारंभी पु.भन्ते पय्यानंद (लातूर),पु.भन्ते धम्मशिल यांनीही उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका यांना धम्म देसना दिली.या प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी सांगितले की,धम्मचित्त शुद्ध करतो,मन शुद्ध करतो हे सांगुन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना मुळ धम्म दिला.त्यामुळे बाबासाहेबांच्या नजरेतून धम्म पाहयला शिका,संशोधनातून खरा इतिहास कळेल असे सांगून जिल्हा परिषद व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांकडून तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी शिफारस करते अशी ग्वाही देवून धम्म परिषदेला एका महिलेला स्वागताध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार संजयभाऊ दौंड यांनी तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण येथील बुध्द विहारास तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी आपण पञ देवून शिफारस केल्याचे सांगितले,रस्ता व इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचेकडून भरीव निधी उपलब्ध करून देईन असे सांगून
जीवन जगण्याची आदर्श पद्धत धम्मात सांगितली असल्याचे नमुद करून भारताला महासत्ता करण्यासाठी बुद्ध व बाबासाहेबांची खरी गरज आहे. विद्यमान स्थितीत बहुजन समाजाची मुले शिक्षणात पुढे गेली पाहिजेत असे विचार दौंड यांनी व्यक्त केले.यावेळी मूकनायक पञकारीता पुरस्कार प्राप्त प्रदीप तरकसे व दादासाहेब कसबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.परिषदेनिमित्त घेण्यात आलेल्या 17 ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले.तर परिषदेचे सुत्रसंचालन प्रा श्रावण गिरी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार जगन सरवदे यांनी मानले.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन प्रा डॉ विनोद जगतकर यांनी केले.तर यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे,जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव,सभापती उर्मिलाताई गित्ते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक करताना प्रा.प्रदीप रोडे यांनी बौद्ध धम्म भारतभर वाढावा,बौद्ध धम्माचा प्रसार व्हावा यासाठी बौद्ध धम्म परिषदांच्या माध्यमातून चांदापूर या ठिकाणी लवकरच विपश्यना एक भव्य सेंटर सुरू करीत असल्याची माहिती रोडे यांनी दिली.अध्यक्षीय समारोप अॅड. अनंतराव जगतकर यांनी केला. संयोजन समितीने चांदापुर येथील चोखोबाच्या उंच माळावर या धम्म परिषदेची अतिशय चांगली व्यवस्था केली होती. पिण्याचे शुध्द पाणी, आल्पोपहार व योग्य व्यवस्था करण्यात आली.पुस्तक,ग्रंथ विक्रीचे स्टॉलही होते.भव्य शामियाना,उपासक,उपासिका यांना बसण्यासाठी स्वतंञ व्यवस्था.प्रशस्त धम्मपीठ लक्ष वेधून घेत होते.वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द,अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी उपासक, उपासिका या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.बौध्द धम्म परीषदेच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे मुरलीधर कांबळे (बौद्धाचार्य),अर्जुन वाघचौरे (बौद्धाचार्य),माणिक रोडे,मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे,राज जगतकर, प्रभाकर बडे,प्रा.बी.एस. बनसोडे,किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे,अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे, धनंजय जोगदंड,सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड,रूक्मीण गोरे,लखन,संजय सिंगणकर, चंद्रकांत बनसोडे शाहीर गौतम सरवदे विठ्ठल वाघमारे संजय जोगदंड,श्रीराम वैद्य, प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर तसेच तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणचे चंद्रकांत इंगळे,प्रा.प्रदिप रोडे,राजेंद्र घोडके,राहुल घोडके,प्रा.गौतम गायकवाड, सचिन वाघमारे,जगन सरवदे, विश्‍वनाथ भालेराव,सिमा इंगळे आदींनी पुढाकार घेतला.या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.