महिला विशेषसामाजिक

"विद्यार्थिनी प्रबोधनासाठी बाहेर पडणार " - स्वातीताई मोराळे

आठवडा विशेष टीम―आज काल टीव्ही चालु केला आणि पेपर उघडला की स्त्रियावर होणार अत्याचार, बलात्कार तर त्यांची होणारी फसवणूक हेच पहिला मिळते. कायदा कडक झाला पाहिजे, शिक्षा लवकर झाली पाहिजे हे त्रिकाला बादित सत्य आहे.
हे करत असताना शाळेतील विद्यार्थीनी यांना प्रबोधन करणे गरजेचे वाटते. आठवी, नववी अकरावी या मुलींना प्रबोधन करण्यासाठी 20 फेब्रुवारी पासून शाळा व कॉलेज मध्ये जाऊन या मुलींशी संवाद साधून त्यांना प्रबोधन करण्याचे काम मी स्वतः करणार आहे.
ओबीसी फौंडेशन इंडिया महिला आघाडी व स्वातीताई मोराळे सखी मंच मध्ये काम करणाऱ्या महिला संपूर्ण महाराष्ट्र भर उपक्रम राबवणार आहोत.
महिला वरील होणारे अत्याचार, त्यासाठी मुलींनी घ्यावयाची काळजी, स्वसंरक्षण, त्यावरील उपाय, प्रलोभने याला बळी न पडणे, पोलीस, पालक यांच्याशी कसा संपर्क साधावा, प्रसंगावधान कसे दाखवावे याबाबत प्रबोधन करणार आहे. यामध्ये आठवी, नववी व अकरावी च्या मुलींवर भर देऊन आशा दुष्कर्त्याना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी आम्ही स्वतः शाळा कॉलेज यांच्याशी संपर्क साधू किंवा त्यांनी
(8485883863) क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क करावा.
स्वातीताई मोराळे
राष्ट्रीय अध्यक्ष :ओबीसी फौंडेशन इंडिया.
संघटक :स्वातीताई मोराळे सखी मंच, महाराष्ट्र राज्य.