ब्रेकिंग न्युज

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या “पेडल-टु-गो” ग्रुपचे राजकिशोर मोदींकडून कौतुक

कारवाँ फांऊडेशनचा उपक्रम ; उदगीर ते अंबाजोगाई 110 कि.मी. सायकलवर प्रवास

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कारवा फांऊडेशन,उदगीर (जि.लातूर) आणि “पेडल टु-गो” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सायकल स्वारांचा ग्रुप अंबाजोगाई शहरात मंगळवार, दि.11 फेब्रुवारी रोजी न्यु व्हिजन पब्लिक स्कुल येथे आला होता. दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची प्रेरणा घेवून वृक्षारोपना करीता पुढाकार घ्यावा.या विधायक हेतुने हा ग्रुप कार्य करीत असून उदगीर ते अंबाजोगाई तब्बल 110 कि.मी. प्रवास तोही सायकलवर करून या ग्रुपने चांगला संदेश दिला. विद्यार्थ्यांसाठी सीडबॉल कार्यशाळा घेतली.त्यांच्या उपक्रमाचे स्वागत करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी “पेडल टु-गो” या ग्रुपचे कौतुक केले.

शहरातील रिंगरोड नजीक असणार्‍या मोदी लर्निंग सेंटर येथे सीडबॉल कार्यशाळा व हा कौतुक सोहळा संपन्न झाला. या माध्यमातून एक नविन संदेश विद्यार्थ्यांना,अंबाजोगाईकरांना अनुभवता आला.सुमारे 12 वर्षांपासुन हा ग्रुप कार्यरत आहे,उदगीर ते तिरूपती, रामेश्‍वरम,वाराणसी,स्टॅच्यू ऑफ युनिटी,अंबाजोगाई आदींसह विविध शहरात हा ग्रुप सायकल द्वारे पोहोचवून त्या ठिकाणच्या नागरिकांना पर्यावरणाची महती पटवून देण्यासाठी तसेच लहान मुलांना सायकलीची आवड निर्माण व्हावी,त्यांचा व्यायाम व्हावा त्यांच्या मध्ये फिजीकल फिटनेस वाढून प्रात्यक्षिकांद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थी व नागरिक यांना प्रोत्साहित करण्याचे काम हा ग्रुप करीत आहे.या ग्रुपचे ओमकार गांजुरे, यांनी अंबाजोगाईत येवून श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुल परिसरात सीडबॉल कार्यशाळा घेतली व विद्यार्थ्यांना सिडबॉल कसा तयार करायचा याची माहिती दिली.प्रात्याक्षिके दाखविली.हे सीडबॉल गावाशेजारील डोंगरमाथ्यावर,शेत,बांध,धुरे या ठिकाणी टाकल्यावर तेथे काही दिवसांत बी उगवते या बियापासुन तयार झालेल्या रोपाला वटवृक्ष करण्यासाठी नियमित पाणी द्यावे,पर्यावरण जतन करण्याचे प्रात्याक्षीक त्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या या उपक्रमाचे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.या ग्रुपमध्ये 20 जण होते.त्यात ओमकार गांजुरे, डॉ.संजय कुलकर्णी,विकास देशमाने,डॉ.प्रविण मुंदडा, डॉ.नरेंद्र जाधव,महेश जिवणे, सतिष फुलारी,प्रदिप पत्तेवार, प्रकाश चाटनाळे,सार्थक धोंगडे,संदीप आडके,विष्णु लंके,विवेक होळसांबरे, डॉ.संतोष मानकर,गिरीष सोलापुरे,विजय रंगवाल,गोविंद रंगवाल,कृष्णा कुंभार,नारायण पोले,जगदीश चिद्रेवार,चंद्रशेखर वट्टमवार या व्यवसायाने डॉक्टर, अभियंते,प्राध्यापक,व्यापारी आणि काही पुर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते यांचा समावेश होता.या कौतुक सोहळ्याला नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर,विजय रापतवार,अजीम जरगर,जावेद गवळी,न्यु व्हिजन पब्लिक स्कुलचे प्राचार्य रोशन पी.नायर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

  • “पेडल टु-गो” उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा- राजकिशोर मोदी

आजच्या प्रगत युगात लहान मुले यांनी सायकलचा वापर केला. तर त्यांचे शरिर सुदृढ व निरोगी राहिल व त्यांच्यामध्ये तंदुरूस्ती निर्माण होईल.नियमीत सायकल वापरल्याने इंधन बचत होवून पर्यावरणाचे संवर्धन होईल. “सीडबॉल” या संकल्पनेतून गांव व परिसर यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष निर्माण होवून हरितपट्टा तयार होईल.ग्लोबल वार्मिंग पासुन पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम हा ग्रुप करीत आहे.प्रात्यक्षिकांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले आहे.हा प्रेरणादायी उपक्रम अंबाजोगाई शहरात सुरू करून त्याचा फायदा पुढील काळात विद्यार्थी, नागरिक आणि पर्यावरणासाठी होईल.”पेडल टु-गो” उपक्रमास खुप शुभेच्छा.

  • भविष्यात लातूरला रेल्वेने पाणी आणण्याची गरज पडू नये-विकास देशमाने

“पेडल टु-गो” या उपक्रमाद्वारे गेल्या 12 वर्षांपासुन देशाच्या कोनाकोपर्‍यात सायकलद्वारे भ्रमंती करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम आम्ही करीत आहोत.मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड,पर्यावरण संवर्धन, पाण्याचा योग्य वापर होणे काळाची गरज आहे.केवळ सरकारी योजनेवर अवलंबुन न राहता नागरिकांनी स्वतःहुन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला नाही.तर भविष्यात मराठवाड्याचे वाळवंट होईल. तसेच लातूरला रेल्वेने पिण्याचे पाणी आणावे लागले.हे भविष्यात होवू नये व तशी ओळख पुसण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.


Back to top button