महाराष्ट्र राज्यसामाजिक

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते नाशिक येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण

आठवडा विशेष|ज्ञानेश्वर पाटील.

नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

श्री.महाजन यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नकाते आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दामोदर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुलचे आर्मी विंग, नेव्हल विंग, एअर विंग तसेच अश्वदल, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन वाहन, वरुण वाहन, वज्र वाहन, के डब्ल्‌यु कॉलेज, न्यु मराठा वाघ गुरुजी शाळेचे स्काऊट पथक आणि पोलीस बँड, डॉग युनिट वाहन, जलद प्रतिसाद पथक आदी पथकांनी सहभाग घेतला.

संचलनाच्यावेळी सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका, चाईल्ड लाईन, समाजकल्याण, मतदार जागृती, जलयुक्त शिवार, आयुषमान भारत, आदिवासी विकास विभाग आदी विविध चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यवरांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालक अश्वती दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.
रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ध्वजारोहणानंतर देशाच्या संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात जेम्स इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लखांब आणि एरीयल सिल्क स्पोर्टस् तसेच पेठ तालुक्यातील नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची मते जिंकली.

फ्रावशी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी समुहगीत, न्यू इरा इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारुड, आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशक्तीपर समुह नृत्य आणि समर्थ योग संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ‘योग यज्ञ’ हा कार्यक्रम सादर केला. एमएसबी एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ताल आणि शिस्तबद्ध बँड फार्मेशला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.