अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

अंबाजोगाई: खोलेश्वर जिनिअस इंटरनॅशनल सीबीएसई स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन 265 पारितोषिकांचे वितरण

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील खोलेश्वर जिनिअस इंटरनॅशनल सीबीएसई स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.मान्यवरांचे हस्ते 265 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.तर बहारदार सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खोलेश्वर जिनिअस इंटरनॅशनल सीबीएसई स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण कार्यक्रम खोलेश्वर महाविद्यालय, गोपीनाथराव मुंडे सभागृह, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.मकरंद पत्की तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिपिन क्षिरसागर हे होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून धर्मराज बिरगड हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलन व स्वागतगीताने झाली.स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजनंदिनी मुंडे हिने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन करताना खोलेश्वर जिनियस इंटरनॅशनल सी.बी. एस.ई स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी वाघ यांनी शाळेचे यश, प्रगती याबाबतची माहिती दिली. प्रमुख पाहुणे ॲड.मकरंद पत्की यांनी,"आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल कशी करावी व आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट कसे करावे" याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना बिपिनजी क्षिरसागर यांनी,"मुलांना शाळेतील जीवनात अभ्यासाबरोबर‌ खेळ व कलागुणांना वाव मिळावा" याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात 265 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.शाळेत माता व पाल्यांच्या ही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांचे आभार श्रीमती. ज्ञानेश्वरी वाघ मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

बहारदार सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने

खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कुलमध्ये स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभाताई जाधव तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी,कल्पनाताई चौसाळकर (भा.शि.प्र.सं. सहकार्यवाह),अप्पाराव यादव (केंद्रीय कार्यकारणी सदस्य), बिपीनजी क्षिरसागर (स्थानिक कार्यवाह),ॲड मकरंद पत्की (अध्यक्ष,खोलेश्वर जिनियस इंटरनॅशनल सी.बी.एस.ई. स्कूल.),श्रीमती नभाताई वालवडकर (भा.शि.प्र.सं. सदस्य),धर्मराज बिरगड (अध्यक्ष,अर्थ समिती,खोलेश्वर जिनियस इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल.) या मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलन व स्वागतगीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी वाघ मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती शोभाताई जाधव यांनी, "जीवन जगताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या दोन रुपये आपल्याजवळ असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्यावे व एक रुपयाची भाकरी घ्यावी.भाकरी आपल्याला जीवन देईल व पुस्तक आपल्याला जीवन कसे जगावे हे सांगेल" असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना राम कुलकर्णी यांनी,"भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची सी.बी. एस.ई स्कूल गरीबांच्या मुलांनाही सी.बी.एस.ई सारखे दर्जेदार शिक्षण मिळावे.यासाठी सुरू केली आहे" असे सांगितले. शाळेची या वर्षाची स्नेह संमेलनाची थिम ही कंझर्वेशन होती.त्यामुळे सर्व प्रकारची कंझर्वेशनचा समावेश करण्यात आला.जसे की,कंझर्वेशन ऑफ ट्री,कंझर्वेशन ऑफ कल्चर, कंझर्वेशन ऑफ एन्व्हॉर्नमेंट शाळेतल्या चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी अंबानगरीतील मान्यवर,माता पालक,पिता पालक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी चिमुकल्यांचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूलचे सर्व शिक्षक,शिक्षिका व कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.