अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेत श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे यश

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी 350 पोस्टरमधून पटकावले प्रथम व द्वितीय पारीतोषीक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ए.पी.टी.आय व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवलिंगेश्र्वर फार्मसी कॉलेज, अलमला येथे आयोजीत राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारीतोषीक पटकावले.

प्रथम पारितोषीक राहुल खलेलकर व समाधान कांबळे आणि द्वितीय पारितोषीक कु. गितांजली शेवाळे व कु.धनश्री कुलकर्णी यांना मिळाले.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 350 पेक्षा अधिक पोस्टर आले होते.प्रथम व द्वितीय पारितोषीक पटकावून कॉलेज व अंबाजोगाई शहराचा सर्वदूर नांवलौकिक केला.या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्राचार्य डॉ.प्रद्युम्न इगे प्रा.कृष्णा झांबरे,प्रा. रिजवान पठाण,प्रा.नरेशकुमार जैस्वाल,प्रा.गितांजली चव्हाण, प्रा.काव्या रेड्डी,प्रा.मंजुषा करेप्पा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी. एच.थोरात,संस्थेचे मार्गदर्शक प्रा.वसंतराव चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रद्युम्न इगे व डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष तरके व प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.