औरंगाबाद जिल्हासामाजिकसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगावात गजानन महाराज प्रगट दिन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―गजानन महाराज प्रगट दिन आणि मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने सोयगावला तीन दिवसीय सामुहिक पारायण सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला.प्रगट दिनानिमित्ताने शिनिवारी पहाटे मंगल स्नान,मंत्र श्लोक,अभिषेक औक्षण,आरती,अर्थविश्व पठन,आदी विधी करून सामुहिक पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली,यावेळी शहरातून आमखेडा भागातून गजानन महाराजांची पालखी सोहळा काढण्यात आला होता.यावेळी महिलांनी अंगणात सडा,रांगोळ्या काढून पालखी चे स्वागत केले.प्रगट दिन सोहळ्या निमित्ताने गजानन महाराज मंदिर परिसर दणाणून गेला होता,यावेळी भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती.दुपार नंतर महाप्रसाद कार्यक्रमांनी प्रगट दिन सोहळ्याची सांगता करण्यात आली,यावेळी कुसुमताई वाडेकर,रघुनाथ वाडेकर,प्रकाश झवर,किशोर मंडेरा,राजू झवर,सतीश झवर,अरविंद कुलकर्णी,दत्ता सोहनी,सुभाष काळे,रमेश चौधरी आदींनी पुढाकार घेतला होता.