औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिकसोयगाव तालुका

सोयगाव: रामपूरवाडी शिवारातील सिमेंट बांधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे ; मातीमिश्रित वाळूचा वापर

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यातील रामपूर वाडी शिवारात सिमेंट बांधाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जा चे झाल्यामुळे लगेच पडले. पुन्हा नव्याने करण्याऐवजी थातुर मातुर पध्दतीने काम उरकण्यात येत आहे.
सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत रामपूर वाडी शिवारात सिमेंट बांधाचे नुकतेच काम करण्यात आले काम परंतु काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने लगेच बंधारा पडला.ही बाब संबंधित विभागाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देखील कामाचा दर्जा तपासण्यासाठी कोणीही अधिकारी न फिरकल्याने कंत्राटदाराने अर्धवट तुटून पडलेला नाला बांध तसाच थातुर मातुर उरकून पुन्हा उभा केला जात आहे.मातीमिश्रित वाळूचा वापर होत असल्याने असून हा सिमेंट बांध किती काळ टिकणार याबद्दल साशंकता आहे.

लाखोच्या कामावर मोबाईल नियंत्रण सदरील कामाविषयी जि. प. सिंचन विभागाचे शाखा अभियंता श्री घूणावत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचललाच नाही.उपअभियंता श्री सिद्दिकी यांना संपर्क केला असता कामाची पाहणी करून चौकशी केली जाईल असे उत्तर मिळाले.सिंचन विभागाचे सोयगांव ला कार्यालय नाही पंचायत समितीत या विभागाचे कुणीही उपलब्ध होत नाही त्यामुळे लाखो रुपयांच्या विकास कामांवर देखरेख आणि नियंत्रण हे केवळ मोबाईल वरूनच होत आहे.आणि त्यामुळेच दर्जाहीन कामे उरकून शासनाला चुना लावल्या जात आहे.