बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिक

बीड: महाजनवाडीकरांची महावितरणकडून फसवणुक ; ट्रान्सफॉर्मर न देताच नियमित विजबिल वसुली

बीड:डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर―मौजे महाजनवाडी ता.जि.बीड येथिल सुरवसे- पठाण वस्ती एकुण 15 घरे आणि मतदान 50 , या वस्ती वरील ग्रामस्थांना महावितरणच्या अभियंत्याने तुम्ही 10 विजबिल कोटेशन भरा तुम्हाला सिंगल फेज ट्रान्स्फर देण्याचे आश्वासन दिले.दोन वर्षांपूर्वी पासुन वस्ती वरील ग्रामस्थ नियमित विजबिल भरत आहेत परंतु त्यांना ट्रान्स्फर दिलाच नाही. माञ नियमित विजबिल भरण्याचा तगादा लावत ग्रामस्थांना झुलत ठेवले.
वस्तीवरील बाबु पठाण 4470 रू , गौडु पठाण 4580 , बबन सुरवसे 4650 रू., राजु पठाण 4530 रू.,चांद पठाण 4400 रू , बाबु सुरवसे 3850 रू.तसेच कृष्णा सुरवसे, गोकुळ सुरवसे, बाळासाहेब सुरवसे यांच्या नावे तेवढीच विजबिलाची थकबाकी आलेली आहे.

खा.प्रितमताई मुंढे यांच्या पञाला केराची टोपली― युवराज सुरवसे

सुरवसे- पठाण वस्ती वरील युवराज सुरवसे यांनी सांगितले आम्ही ग्रामस्थ बीडला ताईंच्या कायाॅलयात 6 महिन्यापुवीॅच गेलो होतो. तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे यांनी खा.प्रितमताई मुंढे यांच्या सहीचे पञ महावितरण अभियंता यांच्या नावे दिले होते. परंतु तरीही 6 महिने झाले महावितरनने ट्रान्सफॉर्मर अद्याप दिला नाही. खासदारांच्या लेखी पञाचा सुद्धा धाक आधिकारी वगाॅला राहीला नाही.

विजबिले भरूच नका―स्वप्निलभैय्या गलधर

खासदारांच्या लेखी पञाचा सुद्धा आधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे वस्तीवरील ग्रामस्थांनी ताईचे कायॅकतेे मा.स्वप्निलभैय्या गलधर यांच्याकडे कैफियत मांडली असता स्वप्निलभैय्या गलधर यांनी कुणीही विजबिल भरू नका असे सांगितले त्यानंतर ग्रामस्थांनी विजबिल भरणे बंद केले आहे.

निर्लज्ज महावितरणचा तगादा ,1000 रू तरी भरा

वस्ती वरील ग्रामस्थांना ट्रान्स्फर न दिल्याने 3 महिन्यापासुन विजबिल भरण्याचे बंद केले आहे .परंतु त्यांच्यानावे सध्या 4000 रू च्या वर विजबिल नियमित येत असून ट्रान्स्फर देण्याऐवजी महावितरणचे अभियंता बिलावर स्वतःच्या सहीने कमीतकमी 1000 रू.तरी बिल भरा असा तगादा लावत आहेत.बीडला महावितरणच्या मोठ्या आॅफीस मधे गेल्यानंतर मोठ्या साहेबांनी सिंगल फेज ट्रान्स्फर हवा असेल तर लाख रू.लागतील असे सांगितले.
लाख रू भरण्यापेक्षा आहेत ते विजमिटर महावितरणने घेऊन जावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

श्रीराम घरत यांनी दिलेल्या एका सौरऊजेॅच्या दिव्याचाच आधार

सिंगल फेज ट्रान्स्फर नसल्यामुळे वस्तीवरील ग्रामस्थांना श्रीराम घरत यांनी दिलेल्या एका सौरऊजेॅच्या दिव्याचाच आधार असून वस्तीवरील ग्रामस्थांकडुन त्यांचे आभार मानले जात आहेत.
लवकरच ग्रामस्थांना सिंगल फेज ट्रान्स्फर देऊन विजपुरवठा केला नाहीतर ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.