बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

साविञीच्या लेकींना न्याय, रास्ता रोको आंदोलनाचे यश ; लिंबागणेश ते काळेवाडी रस्त्याचे काम सुरू―डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश पासून 3 की.मी.असलेल्या मुळे वस्ती, वायभट वस्ती, गिरे वस्ती, काळेवाडी, जोगदंड वस्ती, रणखांब वस्ती वरील अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीवरील लहान मुलामुलींना पावसाळ्यात गुढघाभर पाण्यात चिखल तुडवत रस्त्याने लिंबागणेश येथिल शाळेत जावे लागत असे. तसेच वस्तीवरील शेतक-यांचा प्रामुख्याने दुध विक्री व भाजीपाला विक्री व्यवसाय असल्यामुळे पावसाळ्यात चारचाकी वाहन चिखलाच्या रस्त्यावरून जात नसल्यामुळे बैलगाडीचा वापर करावा लागतो. तसेच पेशंटला वाहन येत नसल्यामुळे खांद्यावरून लिंबागणेशला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागत असे.

राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचे यश; लेकींसाठी महीला रस्त्यावर उतरल्या- डाॅ.गणेश ढवळे

वारंवार शासन दरबारी हेलपाटे मारून सुद्धा रस्ता न केल्यामुळे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली वस्तीवरील महिला रस्त्यावर उतरल्या.व रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर सरपंच बाळासाहेब मुळे यांनी तात्काळ रस्ता तयार करून देण्यात येईल असे आश्वासन देत जास्त चिखलाचे खड्डे असलेल्या रस्त्यावर ग्रामस्थांच्या मदतीने काही ट्रक्टर मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.

मा.महिला व बालकल्याण मंञी तथा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी रस्ता दिला―सरपंच स्वप्निलभैय्या गलधर

आज या लिंबागणेश ते मुळे वस्ती- गिरे वस्ती- वायभट वस्ती- जोगदंड वस्ती- रणखांब वस्ती या 3 कि.मी. रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन महिला व बालकल्याण मंञी तथा ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंढे यांनी निधि दिला असुन या रस्ता मंजुरीकरण व निधि देण्याचे श्रेय पंकजाताई मुंढे यांनाच असल्याचे लिंबागणेश गावचे सरपंच तथा ताईचे समथॅक स्वप्निलभैय्या गलधर यांनी सांगितले. आज या रस्त्याचे उद्घाटन मा.पं.स.सदस्य राजेभाऊ अप्पा गिरे यांनी नारळ फोडुन भुमिपुजन केले. यावेळी उपसरपंच शंकर वाणी, ज्येष्ठ नेते रविंद्रजी निमॅळ, जीवन मुळे , अॅड.गणेश वाणी, ग्रा.पं.सदस्य समीर शेख, गणेश लिंबेकर, सुरेश ढवळे, दादा गायकवाड, सुरेश निमॅळ, रामचंद्र गिरे, अक्षय वायभट, प्रमोद रणखांब, संतोष भोसले, उत्तरेश्वर जोगदंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांच्या संवेदनशीलतेचं यश―डाॅ.गणेश

ढवळे लिंबागणेशकर

या वस्तीवरील लहान मुलांना गुढघाभर पाण्यात चिखल तुडवत रस्त्याने जाताना पाहुन याप्रकरणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आवाज उठवला होता. या प्रकरणाला बेटी बढाव बेटी पढाव या शासनाच्या संकल्पनेलाच हरताळ फासला जात असूनाया साविञीच्या लेकींना न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवॅ वतॅमानपञांनी मुखपञावर प्रसिद्ध देत महिला व बालकल्याण मंञी तथा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. याप्रकरणी मांजरसुंबा ते पाटोदा या राष्ट्रीय महामार्गावर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली महीला रस्त्यावर उतरल्या होत्या.त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सवॅ वतॅमानपञांनी प्रसिद्धी दिल्यामुळे ना.पंकजाताई मुंढे यांनी निधि उपलब्ध करून दिला.त्याबद्दल ना.पंकजाताई मुंढे व प्रसारमाध्यमांनी साविञीच्या लेकींना न्याय मिळवुन दिला असल्याची भावना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बोलुन दाखवली.