अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराष्ट्रीयविशेष बातमीशैक्षणिक

बीड: शेतकऱ्याच्या मुलाची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी ; रवी मुंडे यांची मंडल कृषी अधिकारी पदासाठी निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मौजे अंबलटेक येथील शेतकरी कुटुंबातील रवि विष्णु मुंडे या तरूणाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले.मंडल कृषी अधिकारी म्हणुन ते गुरूवारी गेवराई येथे रूजू झाले आहेत.

महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मंडल कृषी अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत रवि विष्णु मुंडे हे पात्र ठरले.त्यांना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आपल्याच जिल्ह्यात अधिकारी म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.त्यांची निवड झाल्यानंतर ते अंबलटेक या आपल्या मुळ गावी आले असता गावक-यांनी त्यांची वाजत- गाजत सवाद्य मिरवणूक काढून नागरी सत्कार केला.रवि विष्णु मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबलटेक,माध्यमिक शिक्षण वरवटी येथील वसंतराव नाईक विद्यालय,अंबाजोगाई येथे योगेश्‍वरी नूतन विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण हे दयानंद महाविद्यालय लातूर व कृषी विषयक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहु कृषी महाविद्यालय,कोल्हापुर येथे झाले आहे.आपल्या निवडी विषयी बोलताना व गावक-यांच्या नागरी सत्काराला उत्तर देताना रवि विष्णु मुंडे म्हणाले की,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्य, सचोटी,मेहनत व सभोवतालच्या चांगुलपणाची उजळणी केली पाहिजे हे सांगितले.आपल्या यशात आई-वडील,चुलते पंडीत मुंडे,अशोक मुंडे,शामसुंदर मुंडे,वसंतराव नाईक विद्यालय, वरवटी या संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे,कै.अनंतराव चाटे, जनार्धन मुंडे,लहुदास मुंडे, वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव चाटे,उपमुख्याध्यापक सुग्रीव नेहरकर,डॉ.व्यंकटी नागरगोजे, माणिक गुट्टे,अविनाश मुंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याचे रवि मुंडे यांनी यावेळी सांगितले.