अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने विद्याधर पंडीत सन्मानित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे यांच्या वतीने दिला जाणारा "राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार" अंबाजोगाई येथील विद्याधर पंडीत यांना नुकताच प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल चिञकार विद्याधर पंडित यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच 41 वी राज्य कला शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत जागतिक किर्तीचे निसर्ग चित्रकार अरुण दाभोळकर व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ यांचे पदाधिकारी यांच्या हस्ते विद्याधर पंडीत यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व फेटा असे आहे. पंडीत यांनी सदरील पुरस्कार सहपरिवार स्वीकारला.विद्याधर पंडीत हे मानवविकास अपंग विद्यालय,अंबाजोगाई (जि.बीड) येथे शिक्षक म्हणून गेल्या वीस वर्षांपासून कला अध्यापनाचे कार्य करीत आहेत.त्यांचे विद्यार्थी ही आज चित्रकला या क्षेत्रात नावांरूपास आले आहेत. यापूर्वी पंडित यांना बीड येथील रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा "जिल्हास्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड" तसेच शक्ती प्रतिष्ठान,बीड यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे.यासह वेळोवेळी त्यांना राज्य,विभाग, जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन हे जहाँगीर आर्ट गॅलरी(मुंबई),खजुराहो इंटरनॅशनल आर्ट मेला तसेच इंडिया आर्ट सोसायटी यांच्या चित्रप्रदर्शनात भरविण्यात आलेले आहे.विद्याधर पंडीत यांच्या चित्रकलेची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे.पंडीत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, डॉ.डी.एच.थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण,दिनकर जोशी,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी, मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मुख्याध्यापक सी.व्ही. गायकवाड,मुख्याध्यापिका सौ.अंजलीताई जोशी,प्रा.गौतम गायकवाड आदींसह मित्र, परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.