स्ञीभ्रुण हत्येतील आरोपी डाॅ.अशोक थोरात पंकजाताई मुंडेंमुळे झाला जिल्हा शल्यचिकित्सक ,जिल्हयाची मान शरमेने झुकतेय―डाॅ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―डाॅ.अशोक थोरात उपजिल्हा रूग्णालय केज जि.बीड येथे कायॅरत असताना दि.1 जुलै 2012 रोजी घडलेल्या अल्पवयीन अविवाहित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीशी संगनमत करून गभॅपात केल्याप्रकरणी अतिरिक्त सञ न्यायालय , अंबेजोगई येथे दाखल झालेल्या सञ प्रकरण क्र.82 / 2013 मध्ये मा.न्यायालयाने दिलेल्या निणॅयातील प्रतिकुल शे-यानुसार डाॅ.अशोक थोरात व डाॅ.श्रीमती प्रतिभा थोरात यांच्या विरूद्ध शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करण्याचा प्रस्ताव दि.19 / 8 / 2015 च्या पञानुसार संचालनालयाकडून मागविण्यात आला असून याबाबतीत दि.3 / 12 / 2015 .दि.11 / 2 / 2016 व दि.20 / 4 / 2016 रोजी पञ पाठवुन पाठपुरावा करण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा.न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन कायॅवाही करण्यात येईल असे गोलमोल उत्तर रा शं. जाधव सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना दिलेल्या लेखी पञात म्हटले आहे.
डाॅ.( श्रीमती प्रतिभा अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी या सहा वषाॅपासून कोणतेही काम करित नसताना पगार घेत असल्याबद्दल त्याच्या विरूद्ध म.ना.से. ( शि.व.अ )नियम 1979 च्या आठ नियमानुसार दि.27 / 01 / 2016 रोजी दोषारोपपञ बजावण्यात आली आले आहेत.त्यांचे निवेदन प्राप्त झाल्यावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
डाॅ.अशोक थोरात , वैद्यकीय पदावर कार्यरत असताना त्यांनी जिल्हापरिषदेची तांबवा गटातुन निवडणुक लढवल्या प्रकरणी डाॅ.थोरात यांच्या विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल ) नियम 1979 च्या नियम 8 नुसार विभागिय चौकशीची कायॅवाही सुरू करून चौकशीअंती डाॅ.थोरात यांची पुढील वेतनवाढ भविष्यात परिणाम होईल अशा रितीने 3 वषाॅसाठी रोखून ठेवण्याची शिक्षा बजावण्यात आली आहे.
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( वै ) आ.से.लातुर मंडळ, लातुर तथा चौकशी आधिकारी डाॅ.दुधाळ के.एच यांनी मा. उपसंचालक आरोग्य सेवा लातुर मंडळ, लातुर यांना दिलेल्या लेखी पञात म्हटले आहे की 1 ) डाॅ.अशोक थोरात बीड जिल्हाशल्यचिकित्सक व सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राठोड यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविलेल्या मनमानी कारभाराची पुणॅ चौकशी केली असता आढळून आले की 1 ) डोळ्याचा तज्ञ हा विकृतीशास्ञ विभागप्रमुखआहे. माझ्यामते हे चुक आहे. डोळ्याचा तज्ञ हा डोळ्याचा वैद्यकीय अधिकारीच असावा.
2 ) स्ञीरोग तज्ञाचा प्रमुख त्वचारोग तज्ञ केला आहे. हे चुकीचे आहे. संबधित विभागाचा विभाग प्रमुख हा त्या विभागातील ज्येष्ठतम आधिकारी असावा तसेच शस्ञक्रीया विभागप्रमुख हे वैद्यकीय अधिक्षक ग्रा..रू.रायमोह येथिल आहेत हे चुकीचे आहे.
3 ) शासन परिपञक दि.22 / 03 / 2012 नुसार ज्या रूग्णालयात 200 पेक्षा जास्त खाटा असतील त्याठिकाणी वरिष्ठ आधिका-यास डी.एम.ओ.व शवविच्छेदन ह्या ड्युटी लावू नयेत.त्याऐवजी आठ ( 8) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी निवडावेत व त्यांनी डी.एम.ओ. आणि शवविच्छेदन करावे. परंतु सा.रू.बीड येथे आजपययॅत डी.एम.ओ.ड्युटी व शवविच्छेदन ड्युटी लावली जात नाही.
वरील सवॅ बाबींचा विचार करता डाॅ.थोरात यांनी नियमाची पायमल्ली केलेली आहे.