पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराष्ट्रीयविशेष बातमीशेतीविषयक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी 'किसान क्रेडिट कार्ड' चा लाभ घ्यावा―ऋषिकेश विघ्ने

बीड:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये लाभार्थी असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शासनातर्फे किसान क्रेडिट कार्ड या सुविधेचा लाभ मिळणार आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे नेते डॉ.ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेन्दारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य देण्यात येत आहे.तसेच किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत बँकांमार्फत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व आवश्यक त्या वेळी एकाच कर्जखात्यामधुन सुलभ व सोप्या कार्यपध्दतीव्दारे शेती व अनुषंगीक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडीट कार्डव्दारे मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या योजनेचे ८४.५७ लाख लाभार्थी असुन क्रियाशील किसान क्रेडीट कार्डधारकांची संख्या ६४.१६ लाख आहे. शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यामध्ये पी.एम. किसान सदर बाब विचारात घेता राज्यातील २०.४१ लाख पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नव्याने किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देता येईल. त्याचप्रमाणे पी.एम. किसान या योजनेमधील नवीन लाभार्थ्यांनादेखील किसान क्रेडीट कार्ड सुविधेचा लाभ देणे आवश्यक राहील. यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत संदर्भात शासनाने एक परिपत्रकाव्दारे सुचना दिलेल्या आहेत. या योजनेसाठी किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये नावं असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शासनातर्फे किसान क्रेडिट कार्ड द्वारे 3 लाखपर्यंतचे कर्ज आणि सोबतच 2 लाख रुपयांचे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा कवच मिळणार आहे. यासाठी नवीन किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा-8 अ, मोबाईल नंबर, पासबुक व उपलब्ध सुविधा नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज, करण्यासाठी व किसान क्रेडिट कार्ड या सुविधेचा लाभ घ्यावा घेण्यासाठी नजीकच्या सेवा केंद्रात भेट द्यावी असे आवाहन भाजपाचे ऋषिकेश विघ्ने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?