जळगाव जिल्हापाचोरा तालुका

राज्यातील निष्क्रिय महाभकास आघाडीला उघडे पाडा―खासदार उन्मेश पाटील

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―राज्यात भाजपच्या सत्ताकाळात फडणवीस सरकारने केलेल्या ऐतिहासिक जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा झाला असून सर्वत्र पाणी मिळत आहे मात्र सहा महिन्याभरापूर्वी राज्यात अस्तित्वात आलेल्या महाभकास आघाडीच्या काळात सर्व विकासकामे ठप्प झाली असून लोडशेडिंगने शेतकरी शेतमजूर होरपळतो आहे, गृहरक्षक दलाच्या बांधवांच्या जिवावर उठलेल्या राज्यसरकारने गृहरक्षक दलाची सेवा थांबवली आहे भरीस भर म्हणून पोलीस पाटील यांचे सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा बोजवारा उडाला आहे भाजप शासनाच्या काळात मागील पाच वर्षात राज्याला वीज दृष्ट्या सक्षम केले होते चालू होते मात्र आता शेतकऱ्यांना वेळेत वीज रोहित्र मिळत नाहीत
राष्ट्रीय महामार्गाचे पैसे , विधवा परित्यक्ता यांना आमच्या सरकारच्या काळात वाढवलेले मानधन नियमित हे शासन देऊ शकत नाही,हे सरकार सर्वच आघाड्यांवर निष्क्रिय ठरत असल्याने अशा निष्क्रिय महाभकास आघाडीला जनतेसमोर उघडे पाडा असे आवाहन खा. उन्मेश पाटील यांनी केले.
भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व ग्रामीण यांच्या वतीने राज्यसरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात मंगळवारी सकाळी अकरा ते चार वाजेदरम्यान तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन कार्यक्रम झाला या आंदोलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.
पुढे ते म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या समस्यांप्रती हे शासन उदासीन असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे जी घोर निराशा शेतकरी बांधवांची झालेली आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याचबरोबर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिलेला नाही त्यामुळे महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंदोलनाचे आयोजन भाजपाच्या वतीने राज्यभर करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे, तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची भाषणे झाली.आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष रमेश वाणी, मधुकर काटे,सदाशिव पाटील, बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, गोविंद शेलार नरेंद्र पाटील,बन्सीलाल पाटील,सुनील पाटील सुभाष पाटील, प्रदीप पाटील ,डी एम पाटील, रवींद्र पाटील, भरत पाटील , अर्चना पाटील, चित्रा पाटील ,उषा पाटील ,किशोर संचेती,सुधीर पुणेकर दीपक माने ,नितीन पाटील,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सातबारा कोरा झालाच पाहिजे, आघाडी सरकारचा निषेध असो,महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजे,वारीस पठाण यांचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.