औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवन सुखकर बनवता येते – प्रा डॉ रामेश्वर मगर
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आज माणसाने विज्ञानाच्या साहाय्याने भरपुर प्रगती केली आहे. आपण विज्ञान स्वीकारले आहे पण आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला नाही. आजही आपला समाज जुन्या वाईट रूढी परंपरेने ग्रासलेला आहे. मानवी जीवन अधिक सुलभ व सोयीस्कर करण्यासाठी विज्ञानासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे.असे मत रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ रामेश्वर मगर यांनी मांडले ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिरीष पवार हे अध्यक्षस्थानी होते तर भौतिकशास्त्र विभागप्रमुख तथा या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ विनोद बारोटे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ दिपक पारधे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शंतनु चव्हाण यांनी केले तर आभार डॉ सुशील जावळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ सुनील चौधरे, प्रा प्रदीप गोल्हारे, प्रा शाम टाकले, डॉ पंकज गावित व डॉ जी एस भगत, डॉ गणेश मिसाळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button