परळी (दि.२८):आठवडा विशेष टीम― राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे औपचारिक उद्घाटन बीडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले यावेळी खा. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चमूने पहिल्याच प्रवेशाने हजारो परळीकरांची मने इतिहासाच्या रेखेत नेऊन सोडली!
ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची कथा परळीकर यांच्यासमक्ष मांडण्यासाठी सिनेअभिनेते खा. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिकेने नटलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची सुरुवात आज परळी येथे झाली. यावेळी स्व. पंडितअण्णा मुंडे रंगमंचाचे औपचारिक उद्घाटन बीडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावान यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष श्री. बजरंग सोनवणे, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, परळी नगर परिषद अध्यक्ष सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष श्री. शकिल कुरेशी, जि. प. गटनेते श्री. अजय मुंडे, न.प. गटनेते श्री. वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. शहराध्यक्ष श्री. बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परळी करांचा उत्साह व प्रचंड उपस्थिती लक्षणीय होती, हे विशेष!
दरम्यान परळीकरांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून सुरू झालेली ‘शिवपुत्र संभाजी’ ही प्रेरणादायी कथा प्रत्यक्ष नाट्य रुपांतरीत केलेली अनुभवली आहे. या नातकाचा दुसरा भाग उद्या संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून शहरातील स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर पुन्हा शिवप्रेमींसाठी उपलब्ध असणार आहे.