बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

एमपीएससी ‘एनटी – ड’ आरक्षण डावलल्याप्रकरणी व ‘एनटी – क’ जागा कमी केल्या प्रकरणी धनंजय मुंडे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

मुंबई दि.२९:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत ६५० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये एनटी – ड प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे २% आरक्षण देण्यात आले नाही, तसेच एनटी – क प्रवर्गातील उमेदवारांना केवळ २ च जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत; याप्रकरणी एनटी- ड व एनटी – क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन शासन निर्णयाप्रमाणे सदर दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अशी विनंती करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे.

काल (दि.२८) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० ची जाहिरात क्रमांक ०५/२०२० प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्यसेवेतील विविध पदांसह पोलीस उपनिरीक्षक गट – ब या पदासाठी ६५० जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.

या ६५० जागांपैकी ४७५ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत, शासन निर्णयाप्रमाणे यापैकी २% जागा एन टी – ड (भ ज – ड) प्रवर्गांसाठी आरक्षित असणे अभिप्रेत आहे, परंतु सदर प्रवर्गांसाठी एकही जागा या जाहिरातीत आरक्षित करण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे एनटी – क (धनगर) प्रवर्गांसाठी आरक्षित जागांपैकी ३.५% जागा आरक्षित असायला हव्या होत्या परंतु या प्रवर्गांसाठी केवळ २ जागा देण्यात आल्या आहेत.

या दोन्ही संवर्गातील अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची तयारी व अभ्यास करत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये आरक्षण डावलल्याप्रकरणी प्रचंड निराशा व संताप व्यक्त आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या दोन दिवसात आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेणार असून, या प्रवर्गावरील अन्याय दूर करून शासन निर्णयाप्रमाणे दोन्ही संवर्गांच्या ठराविक टक्केवारीनुसार आरक्षण देत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत गृहमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ना. मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.