औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: जरंडी,परिसरात विजांच्या कडकडाटात पावूस,पुन्हा संकट

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात पहाटे वादळी वाऱ्याने घेरल्यानंतर रात्री पुन्हा जरंडी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होवून पावसाने वीस मिनिटे थैमान घातले होते.दरम्यान यामुळे ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल 8 गावे अंधारात होती.
जरंडीसह परिसराला रात्री अवकाळी पावसाने वीस मिनिटे धुमाकूळ घातला होता,मात्र पावसापासून शहराला वगळल्याने सोयगाव शहरात पावूस झाला नव्हता.मात्र जरंडी भागात तब्बल अर्धातास पावूस होवून वादळी वारा पुन्हा घोंगावत असल्याने शेतकऱ्यांची मात्र भंबेरी उडाली होती.जरंडी भागात माळेगाव,पिंपरी,निंबायती,बहुलखेडा,कवली आदी ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता.जरंडीला अर्धा तास अवकाळी पावसाने झोडपले.या परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने मात्र गारठा पसरला होता.