बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा ― पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश

बीड दि.०१:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसान भरपाईची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत .

या नुकसान भरपाई नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आहेत.

शनिवारी सायंकाळी तसेच रविवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.