बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशैक्षणिक

मुळुकच्या भोसले वस्तीवरील साविञीच्या लेकींना राञी सौरपथ दिव्याखाली अभ्यास करण्याची वेळ ;  सहाय्यक अभियंताने लाईनमन कडून विजपुरवठा खंडीत केला―डाॅ.गणेश ढवळे

10वी-12 वी च्या विद्याथ्यांचे भविष्य अंधारात

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे मुळुक गावातील भोसले वस्ती हे अंदाजे 100 लोकसंख्या असलेली , एकुण 27 कुटुंबसंख्या आहे, भोसले , ढास, कोटुळे आडनावाचे ग्रामस्थ रहातात.

सिंगल फेज साठी वर्गणी गोळा केली खर्च अंदाजे 50,000 रू झाला

कित्येक वषाॅपासून अंधारातच जिवन घालवलेल्या भोसले वस्तीवरील ग्रामस्थांनी वषॅभरापुवीॅ सिंगल फेज ट्रान्स्फर घेण्याचे ठरवले त्यासाठी वस्तीवरील ग्रामस्थांनी 60000 रू.जमवले.
विद्युत मंडळाची परवानगी घेण्यासाठी 15000 रू.खचॅ आला.ट्रान्स्फाॅमॅर बसवण्यासाठी 30000 रू.खचॅ आला.खाजगी विद्युत पुरवठा करणाराने पोल, तार आदिसाठी 12 ,000 रू.खचॅ आला. प्रायव्हेट तार व 8 पोल साठी 10000 रू.खचॅ आला.

सिंगल फेज लाईटचा आनंद फक्त 15 दिवस टीकला, 5 दिवसापासूप वस्ती अंधारात―डाॅ. गणेश ढवळे

वषॅभरापासून सिंगलफेज लाईटसाठी झटणारी भोसले वस्ती सिंगलफेज लाईट आल्यामुळे आनंदात होती परंतु फारकाळ यांचा आनंद टीकला नाही. वस्ती पासून पुढे काही अंतरावर पोपट मातॅड ढास यांचे घर असून त्यांच्याकडे ञिफेज कनेक्शन आहे. त्याने सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांची दिशाभूल केली की वस्तीवरील लोकांना विद्युत पुरवठा केल्यामुळे मला विजपुरवठा सुरळीत होत नाही. वस्तीचा विजपुरवठा खंडीत करावा.त्यानंतर तात्काळ लाईनमन गायकवाड यांनी भोसलेवस्ती वरील कनेक्शन तोडून विजपुरवठा खंडीत केला.

सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांना जाब विचारला असता ऊद्या जोडणी करून देतो― डाॅ.गणेश ढवळे

भोसले वस्तीवरील ग्रामस्थांनी माझ्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर व सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्याठीकाणी 10 वी व 12 वी चे विद्यार्थी विद्याथीॅनीना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अंधारात अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य महावितरणच्या हलगजीॅपणामुळे अंधारात आहे. याप्रकरणी सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांना जाब विचारला असता थ्रिफेज ग्राहक पोपट मातॅड ढास यांच्या सांगण्यावरून मी लाईनमन गायकवाड यांना विजपुरवठा खंडीत करण्याची सुचना दिल्याचे मान्य केले.

10 वी आणि 12 वी च्या वाषिर्क परीक्षा चालु असल्यामुळे त्यांना अभ्यास करताना अडथळा येत आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे असा जाब विचारला असता ऊद्या सकाळी लाईनमनला विजपुरवठा जोडण्यासाठी सांगतो असे महावितरणचे सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांनी सांगितले.

भोसले वस्तीवरील 10 वी & 12 वी चे विद्यार्थी विद्याथीॅनी
1 ) आकाश खंडु कोटुळे
2 ) बारीक रामदास ढास
3 ) मालन भागवत ढास
4 ) अस्मिता खंडू ढास

वरील विद्यार्थी विद्याथीॅनीना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अभ्यासात अडथळा होत आहे.

दहा हजाराच्यावर विजबिल परंतु कधी बल्ब चमकलाच नाही: भोसले वस्ती ग्रामस्थ

भोसले वस्तीवरील ग्रामस्थांनी सांगितले की त्यांना कधीही सिंगल फेजचा ट्रान्स्फाॅमॅर मिळाला नाही, कधीही घरातील बल्ब चमकला नाही परंतु विजबील माञ 10 हजार रू.च्या वरच येत राहीले.कंटाळून विजबिल भरण्याचे बंद केले. माञ विजपुरवठा न करताच महावितरणकडून भरमसाठ विजबिल येतच राहीले.

रामचंद्र लक्ष्मण ढास 11हजार सहाशे चाळीस रू.
लिंबा लक्ष्मण ढास 8070 रू. आदि.

महावितरणची मुजोरी, सुधरण्यास तयार नाहीत― डाॅ.गणेश ढवळे

सध्या 10 वी & 12 वीच्या वाषिर्क परीक्षा चालु असल्यामुळे त्यांना अभ्यास करताना अडथळा येत आहे. त्यामुळे दि. 24 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी 3 दिवसांपुवी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले होते. परंतु प्रत्यक्ष तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी मंडळ सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांना यापूढे परिक्षेदरम्यान विजपुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्या असे सांगितले असताना सुद्धा पुढच्या य3 दिवसातच भोसले वस्ती वरील सिंगल फेज ट्रान्स्फरचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे पाप त्यांनी केले आहे. याप्रकरणी जाब विचारला असता ऊद्या जोडणी करून देतो एवढंच कोडगेपणाचं उत्तर त्यांनी दिले.