बीड:आठवडा विशेष टीम―अवकाळी आलेल्या पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यासाठी पंचनामे करून रक्कम खात्यात जमा करा.कोणत्याही कारणास्तव पैसे वळवून घेऊ नये.
पोखरा योजना आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर न करता आॅफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची परवानगी द्यावी.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कवच नाकारणाऱ्या विमा कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मा.अमिर हबीब यांनी शासनाला वेळोवेळी ज्ञात केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय शेतकरी पुञ आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.हे शेतकरी आक्रोश आंदोलन बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी मा.सुदाम तांदळे चऱ्हाटाकर,मा.युनुस शेख चऱ्हाटाकर,मा.युसुफभाई बीडकर,मा.इलियास भाई बीडकर,मा.विजय सुपेकर शिवणीकर,मा.ज्ञानेश्वर कांदे वाकडीकर आदी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.