अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अंबाजोगाई: जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयात दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शनिवार,दि.29 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.

जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई या शाळेतील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य/मुख्याध्यापक सी.व्ही. गायकवाड,प्रमुख पाहुणे म्हणुन अंबाजोगाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.एस.ए. बिराजदार,मानव विकास मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, घाटनागनाथच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी उपस्थित होत्या या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील सर्व विषय शिक्षक,शिक्षिका,वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक यांचे ऋण व्यक्त करीत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.यावेळी श्रीमती गुळवे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सामाजिक जीवनात विज्ञान आवश्यक असल्याचे पटवून सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच विनायक मुंजे,आनंद टाकळकर,श्रीमती अंजली जोशी यांनीही आपल्या मनोगतात संस्थेविषयी व शाळेविषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे प्रा.एस.ए.बिराजदार यांनी "पुढील शिक्षणाची दिशा" याविषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.लातुर किंवा इतर ठिकाणी शिक्षण व आपल्या संस्थेतील शिक्षण या मधील तफावत सुद्धा त्यांनी व्यक्त केली शेवटी आपल्या अध्यक्षीय समारोप करताना सी.व्ही. गायकवाड सर यांनी सर्व विषय शिक्षक व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन योग्य ज्ञानाचा वापर करून यश मिळवणे आवश्यक असल्याचे विषद केले.तसेच प्रत्येक विषयावर आपली कमांड ठेवावी. कुठल्याही विषयाला घाबरू नका.सातत्य ठेऊन परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच कुटुंब,शाळा व संस्थेचा नांवलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इयत्ता 10 वी चे वर्गशिक्षक आर.एस. कांबळे यांनी केले तर एस.डी. शिनगारे यांनी "अशी पाखरे येती आणि..." हे गीत सादर करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक,सर्व शिक्षिका आवर्जुन उपस्थित होत्या.