औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: रब्बीच्या नुकसानीत खरिपाच्या अवकाळीचे अनुदान,शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरिपापाठोपाठ रब्बीच्या हंगामातही वादळी वार्यांचा तडाखा आणि अवकाळीचा फटका बसल्याने सोयगाव तालुक्यात २०२८ हेक्टरच्यावर रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला असून,मात्र रब्बीच्या हंगामावरील अवकाळी आणि वादळाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून महसूल विभागाने तातडीने खरिपाच्या अवकाळीच्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तूर्तास मदत म्हणून वर्ग केली आहे.
सोयगाव तालुक्यात १६२० खरिपाच्या अवकालीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी १ कोटी,४९ लाख,६९ हजार ३९२ रु इतकी रक्कम वर्ग केली आहे.सोयगाव तालुक्याला तिसऱ्या टप्प्यात मिळालेल्या पाच कोटीतून हि रक्कम वर्ग केली आहे,या आधी तीन कोटी अठरा लाख ९२ हजार इतकी रक्कम ३१५५ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली होती.त्यातील उर्वरित शेतकऱ्यांना रब्बीच्या नुकसानीत दिलासा मिळावा यासाठी तातडीने तहसीलदार प्रवीण पांडे यांनी हा निर्णय घेवून बाधित शेतकऱ्यांना खरिपाच्या नुकसानीची रक्कम वर्ग केली आहे.त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.