औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार सुदाम शिरसाठ यांना

सोयगाव:आठवडा विशेष टीम―
सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांची खुलताबाद ठाण्यात अचानक बदली झाल्याने सोयगावला ५१ गावांची धुरा आता सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना देण्यात आली आहे.बदली झालेल्या सीताराम म्हेत्रे यांन निरोप तर प्रभारी निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना पदभार देण्यात आला आहे.औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशावरून सुदाम शिरसाठ यांना सोयगाव ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे.यावेळी गुप्तवार्ता विभागाचे विकास लोखंडे,शिवदास गोपाळ,सागर गायकवाड,मंगलसिंग लोधवाल,भूषण चौधरी,रवींद्र तायडे,कविता मिस्तरी,विजय पाटील,दिलीप तडवी,सुभाष पवार,अविनाश बनसोडे,जमादार संतोष पाईकराव,संदीप चव्हाण,विनोद कोळी,गृहरक्षक दलाचे जवान योगेश बोखारे,आदींसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.