बीड जिल्हाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयकसामाजिक

बीड: रस्त्याच्या कामासाठी वापरले चोरीचे गौणखनिज ; कारवाईसाठी डॉ गणेश ढवळेंचे १९ मार्चला उपोषण

अखेर लिंबागणेश पोखरी रस्त्यावर लावली झाडे ; सामाजिक कार्यकर्ते डॉ ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश

१९ मार्चला उपोषण,कारवाई न झाल्यास १३ एप्रिल ला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ते मौजे भाळवणी दरम्यान होत असलेल्या निष्कृष्ट दर्ज्याच्या रस्ते कामामध्ये शासकीय नियमांची अवहेलना करत खनिज क्रमाची चोरी करत रोहयो योजने अंतर्गत वृक्ष संगोपन केलेल्या अंदाजे 25 लक्ष रुपये वृक्षांची JCB च्या सहाय्याने कत्तल करत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून काम करणार्याम संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून अपहरीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यासाठी दि 19 माचॅ 2020 गुरूवार रोजी लिंबागणेश स्मशान भूमी येथे डॉ गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश यांच्या नेतृवाखाली एकदिवशीय लक्षणिक उपोषण व कारेवाई न झाल्यास दि.13 एप्रिल 2020 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ते मौजे भाळवणी दरम्यान होत असलेल्या निष्कृष्ट दर्ज्याच्या रस्ते कामा मध्ये शासकीय नियमांची अवहेलना करत खनिज क्रमाची चोरी करत रोहयो योजने अंतर्गत वृक्ष संगोपन केलेल्या अंदाजे 25 लक्ष रुपये वृक्षांची JCB च्या सहाय्याने कत्तल करत शासनाची फसवणूक केली आहे.
1.रस्ता करण्यासाठी शासकीय नियमाने खडी ही मौजे नाळवंडी येथून खरेदी केल्याचे दाखवले आहे प्रत्यक्षात पोखरी गावं शेजारील बाजीबुवा नामक देवस्थाना शेजारी अवैध रित्या खदान खोदून चोरी करून खनिज द्र्व्याचा वापर केला आहे त्याप्रकरणी संबंधित गुत्तेदार व शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारेवाई करण्यात यावी व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकावे.
2. मौजे लिंबागणेश ते मौजे भाळवणी दरम्यान रोहयो अंतर्गत अंदाजे 25 लक्ष रुपयांचे वृक्ष संगोपन केवळ तेथील मुरूम रस्ते कामासाठी वापरता यावा यासाठी JCB च्या सहाय्याने लावलेली झाडे उकरून फेकून देण्यात आली व शासनाचे 25 लक्ष रुपयांचे नुकसान केले व मुरून नाळवंडी येथून आणला असे दाखवून शासनाची फसवणूक केली तरी संबंधिता कडून अपहरीत रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी.
3. रस्ते कामासाठी वाळू बिंदुसरा नदीतून आणली असून शासन दरबारी कागदोपत्री शहागड येथून आणल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली आहे वरील गोष्टीमुळे 10 कोटी रुपयांचे टेंडर शासनाची फसवणूक करून 14.5 कोटी रुपयाचे प्रस्तावित केले आहे तरी शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून काम करणार्याट संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून अपहरीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यासाठी दि. 19 मार्च 2020 गुरूवार रोजी लिंबागणेश स्मशान भूमी येथे एकदिवशीय लक्षणिक उपोषण करणे व कारवाई न झाल्यास दि.13 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.