बीड जिल्हाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयकविशेष बातमीसामाजिक

बीड: प्रस्तावित मार्ग एक आणि काम सुरू दुसऱ्या मार्गाने, काटवटेवस्ती वरील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित ; १३ एप्रिलला धरणे

डॉ गणेश ढवळें सह काटवटेवस्ती वरील ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यमार्ग 56 -लिंबागणेश- काटवटे वस्ती- अंजनवती- घारगांव असा टेंडरप्रमाणे प्रस्तावित मार्ग असताना गुत्तेदाराने तो बदलुन लिंबागणेश ते अंजनवती ते घारगांव असा चुकीच्या पद्धतीने काम सुरू करून काटवटे वस्ती वरील लोकांना रस्त्याच्या मुलभुत सुविधेपासून वंचित केल्यामुळे दि. 13 मार्च 2020 वार सोमवार रोजी सकाळी 11 वा.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.

सविस्तर वृत्त असे की,मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मुळ प्रवाहापासून वंचित राहीलेल्या दुर्गम भागातील वस्तीवरील ग्रामस्थांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील राज्यमागॅ- 56 - लिंबागणेश- काटवटेवस्ती- अंजनवती- घारगांव असा 8 : 6 किलोमीटर रसत्यासाठी 4 कोटी 29 लक्ष रूपये निधि दिला गेला आहे. तत्कालीन आ.जयदत्तजी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या रसत्यासाठी मंजुरी आणली आहे. बीड मतदार संघातील या दुगॅम असणा-या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्याची मागणी केली जात होती.
परंतु गुत्तेदार जि.प.सदस्य राजेंद्रजी मस्के तथा विद्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या भावाने शासकीय नियमांची पायमल्ली करत टेंडरप्रमाणे रस्ता न करता थेट लिंबागणेश ते अंजनवती गाव ते घारगांव करण्याचे ठरवले असून त्यासाठी मुरूम सुद्धा अंथरला आहे. परंतु अंजनवती गावचे सरपंच सुनिल दादाराव येडे यांनी 26 जानेवारी 2020 च्या ग्रामसभेत लेखी ठराव क्र.25 अशी मागणी केली आहे. की मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता टेंडर नोटीसप्रमाणे म्हणजेच लिंबागणेश- अंजनवती- घारगांव असा प्रस्तावित मागॅ करण्यात यावा. टेंडरप्रमाणे मंजुर रसत्याच्या पुवेॅस काटवटे वस्ती दशॅविली आहे परंतु सध्या चालु केलेल्या रस्ते कामाच्या पश्चिमेस काटवटे वस्ती आढळून येते.तरी सदर चालु काम थांबवुन मंजुर टेंडर नोटीसप्रमाणे करण्यात यावे.टेंडरप्रमाणे सदरचे अंतर 0 / 00 ते 8 / 600 कि.मी.एवढे आहे. यावर ग्रामसभेत सविस्तर चचाॅ होऊन सवॅसंमतीने टेंडर प्रमाणे रस्ते काम करण्यात यावे. असे मंजूर झाले आहे.. या प्रकरणी अंजनवती & काटवटेवस्ती वरील ग्रामस्थांनी दि. 26 जानेवारी 2020 रोजी लेखी तक्रार मा.ना.धनंजयजी मुंढे साहेब यांना दिली आहे.व बीड विधानसभा आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांना दिली आहे.
म्हणून शासनाची फसवणुक करून दिशाभुल करत वाळू, खडी, मुरूम या ठिकाणाचे चुकीचे अंतर दाखवुन रसत्याचा निधि वाढवुन शासनाची फसवणुक करणा-या संबधितावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय धरणे आंदोलन दि. 13 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व अंजनवतीकर व काटवटेवस्ती ग्रामस्थ करणार आहेत.