बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिक

भाजप जिल्हाध्यक्ष मनमानी कारभार, टेंडरप्रमाणे मंजुर रस्ता नाही, अंजनवतीकरांचा रास्ता रोकोचा ईशारा―डाॅ.गणेश ढवळे

बीड दि.०६:आठवडा विशेष टीममुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवती ते घारगांव असा रस्ता टेंडरप्रमाणे मंजुर असताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या भावाने मदन मस्के यांनी लिंबागणेश येथिल थेट अंजनवती असा रस्ता काम सुरू केल्याने काटवटेवस्ती मुलभत सुविधांपासून वंचित असून त्यांनी रस्ता काम बंद पाडले असून ना.धनंजयजी मुंढे साहेब सामाजिक न्यायमंञी तथा पालकमंत्री बीड यांना तसेच बीड विधानसभा आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांना लेखी तक्रार दिली. परंतु काहीच कारवाई न झाल्यामुळे व गुत्तेदार यांनी दमदाटी केल्यामुळे ग्रामस्थांनी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे दि. 11माचॅ 2020 सकाळी 11:30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

सरपंच सुनिल दादाराव येडे : गेली 70 वषॅ आम्ही या वस्ती साठी रस्ता व्हावा म्हणून लढत आहोत.आमदार विनायक मेटे या 4 कोटी 87 लाख रू या रसत्यासाठी मंजूर केले. 26 जानेवारी 2020 रोजी माझ्या अध्यक्षतेखाली ठराव क्र.25 मधे शासनाच्या टेंडर प्रमाणे रस्ता करावा अन्यथा आम्ही रास्ता रोको करू.

ज्योती मधुकर काटवटे:मी नववीत असून मला शाळेसाठी 3 किमी चिखलात पायी जावे लागते.सरकार नुसतंच बेटी पढाव & बेटी बचाव म्हणतंय. आम्ही काय करायचं.

गयाबाई काटवटे: दवाखान्यासाठी लिंबागणेश येथे जावं लागतं, परंतु चिखलातुन जाताना वयोवृद्ध माणसांना ञास होतो.ब-याचजणी बाळंतपणात प्रवास करताना त्यांचे बालकं मरण पावली.

कैलास काटवटे:माझे आजोबा गावचे सरपंच सुद्धा होते त्यांनी स्व.खा केशरकाकु क्षीरसागर यांच्यापासून या रसत्यासाठी संघषॅ केलाय. त्यामुळे टेंडरप्रमाणे मंजुर रसत्याचे काम करावे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लढा देणार―राजेभाऊ काटवटे

आम्ही न्याय मागाॅने आमचे मुलभुत आधिकार मागत आहोत.यापुढे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लढा देणार

डाॅ.गणेश ढवळे : ना.पंकजाताई मुंढे & खा.प्रितमताई मुंढे यांनी त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जि.प.सदस्य राजेंद्र मस्के यांना समज द्यायला हवी कारण त्यांचे भाऊ मदन मस्के हे नियमबाह्य काम पुवॅनियोजित टेंडर प्रमाणे लिंबागणेश ते काटवट वस्ती ते अंजनवती ते घारगांव असा करण्यात यावा. गुत्तेदाराने अरेरावी थांबवावी. यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 12 / 03 / 2020 रोजी वार गुरूवार सकाळी 11:30 वा.लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.