औरंगाबाद: सोयगाव तहसील कार्यालयात विशाखा समिती

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत विशाखा समितीच्या अध्यक्षपदी स्वाती म्हळसाने तर सचिवपदी कोकिळा बांगरे यांची निवड करण्यात आली आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती नियुक्त करण्यात आली.
पद्मा तायडे,उज्ज्वला वामने,दिपाली जाधव,सविता सोनवणे,अश्विनी तुपे या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून या समितीने महिन्यातून एकवेळा बैठक घेण्याचे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटलें आहे.