बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहिला विशेषविशेष बातमीसामाजिक

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्नेहा गणेश ढवळे हिचा अंधश्रद्धेवर प्रहार

लिंबागणेश(बीड):आठवडा विशेष टीम―मारोती मंदिरा शेजारील रूटीचे झाड कोणी तोडत नव्हते, साफसफाई करत नव्हते. रूटीच्या झाडाची पाने मारोतीला वाहतात. त्यामुळे झाड तोडले तर मारोतीचा गावावर कोप होईल ही अंधश्रद्धा.त्यामुळे ग्रामस्थ हिंमत करत नव्हते.आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कु स्नेहा गणेश ढवळे लिंबागणेशकर हिने या रूटीच्या झाडावर म्हणजेच अंधश्रद्धेवर प्रहार केला.

त्याठीकाणी सप्त वृक्षरोपण करण्यात आले.वृक्षारोपण करताना डॉ गणेश ढवळे, स्वप्निल गणेश ढवळे , श्री. दगडु ढवळे , राजेभाऊ जाधव , रणखांब फौजी, प्रकाश शिंदे आणि महाजनवाडीचे माजी सरपंच मा.दत्ता घरत उपस्थित होते.