महाजनवाडीकरांची फसवणुक ; प्रितमताई मुंडे यांचा अनादर करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ विजबिलाची होळी पेटवून महावितरणच्या नावे बोंबाबोंब आंदोलन― डाॅ.गणेश ढवळे

बीड दि.०९ मार्च:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी येथिल सुरवसे-पठाणवस्ती वरील शेतकऱ्यांची सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर न देताच २ वर्षापासून विजबिल वसुली करण्याच्या निषेधार्थ व त्यांना अंधारात ठेवून मुलभुत सुविधेपासून वंचित केल्याच्या निषेधार्थ तसेच खा.प्रितमताई मुंडे यांनी या प्रकरणी त्वरीत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर देऊन विजपुरवठा सुरळीत चालु करण्याचे लेखी आदेश देऊनही तसेच दि.२४ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन दिल्यानंतर मा.श्रीराम बेंडे तहसीलदार व सचिन पुंडरे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेकनुर ठाणे यांनी सहाय्यक अभियंता विजय हलकुडे यांना समजावून सांगितल्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्यांनी सुरवसे पठाणवस्ती वरील शेतकऱ्यांना सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर न देता विजबिल वसुली करण्याच्या निषेधार्थ डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०९ मार्च रोजी महावितरणच्या आवारात प्रतिकात्मक होळी पेटवून विजबिलाची होळी करण्यात आली.