सोयगांव येथील नाट्य कलावंत मानधनापासून वंचित ; मंजुरी असूनही बारा वर्षापासून खेट्या

सोयगांव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
नाट्य पंढरी म्हणून लौकिक मिळवलेल्या आणि शंभर वर्षाच्या नाट्य परंपरेचा वारसा लाभलेल्या सोयगांव येथील नाट्य कलावंत मानधनापासून वंचित असून बारा वर्षापासून मंजूर असलेल्या मानधनासाठी वृद्ध कलावंत जि.प. , प.स. चकरा मारीत आहे.
सोयगांव येथे सन १९०५ साली नटवर्य कै लोटूभाऊ पाटील यांनी श्रीराम संगीत नाट्य मंडळा ची स्थापना केली तेव्हापासून तब्बल शंभर वर्ष तीन पिढ्यांनी नाट्य परंपरा कायम ठेवली.ऐन तारुण्यात रंगमंच गाजवणाऱ्या कलावंतांची उतार वयात फरफट होत असल्यामुळे शासनाने या वृद्ध कलावंतासाठी मानधन योजना सुरू केली.सोयगांव येथील काही कलावंत याचा लाभ घेत आहे.परंतु काही कलावंतांना अद्याप मानधन मिळाले नाही.सन २००६- ७ साली जि प समाज कल्याण विभागाने या कलावंतांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.परंतु त्यांनंतर मात्र गेल्या बारा वर्षापासून मंजूर असून देखील मानधनापासून वंचित कलावंत जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच निवड समिती च्या पदाधिकाऱ्याकडे चकरा मारीत आहे. या बारा वर्षात दोन वेगवेगळ्या निवड समित्यांच्या वादात हे प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहचले न्यायालयाने देखील मंजूर यादीतील कलावंताना मानधन देण्याबाबत निर्णय दिला परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही मानधन मिळाले नाही.आमच्या हक्काचे मानधन आम्हाला मिळावे अशी मागणी प्रल्हाद चौधरी , जगन्नाथ दुतोंडे , विश्वनाथ आगे , बाबूराव ओंकार पाटील , कृष्णा कूर्लेकर , श्रीराम सोहनी ,बळीराम सोनवणे , सुभद्राबाई शेरे , रघुनाथ वाडेकर , सरुबाई काळे , तुळसाबाई देवरे आदींनी लेखी निवेदनाद्वारे जि प समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे केली आहे.तसेच न्याय न मिळाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यादीतील निवडक लाभार्थ्यांना मानधन सुरू
सन २००६- ७ मध्ये जि प ने कलावंताची यादी मंजूर केली तेव्हा यात २३ लोकांना मंजुरी दिली आहे त्यापैकी ८ वयोवृद्ध कलावंत मृत झाले आहे.तर चार कलावंतांना मानधन सुरू झाले आहे.उर्वरित अकरा कलावंताना मात्र वंचित ठेवण्यात आले आहे.तेव्हा चारच कलावंत पात्र कसे ठरले याविषयी शंका उपस्थित होत आहे.

Previous post महाजनवाडीकरांची फसवणुक ; प्रितमताई मुंडे यांचा अनादर करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ विजबिलाची होळी पेटवून महावितरणच्या नावे बोंबाबोंब आंदोलन― डाॅ.गणेश ढवळे
Next post लिंबागणेशकरांनी छञपती शंभुराजे बलिदान दिवस स्मशानभुमीत स्वच्छता मोहीम राबवुन साजरा केला ―डाॅ.गणेश ढवळे