ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीशैक्षणिक

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनाला कोरोणाचा फटका

आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे पहिले राज्य अधिवेशन औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषद तसेच राज्यातील शिक्षक, साहित्यिक, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्ताराधिकारी, पत्रकार समाजसेवक, संघटनात्मक कार्य करणारे, सहकार, आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा,11 ते 13 मार्च 2020 राज्य शासन परवानगी घेऊन विशेष कर्तव्य रजे सह मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच राज्यस्तरीय अधिकारी वर्गाच्या उपस्थित तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढ जिल्हा परिषद शाळा विकास परिसंवादा सह संपन्न होणार होता.
परंतु खबरदारीचा उपाय म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबराज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे, राज्याचे शिक्षण मंत्री नामदारवर्षाताई गायकवाड पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील, आदींच्या व राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी दिलेल्या सुचने नुसारभेटीनंतर तूर्तास अधिवेशन स्थगीत करण्यात आले आहे.कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळुन खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी पुढे येण्याची गरज असून तो जास्त अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाने हा निर्णय घेतला असे आयोजक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव राज्य प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.सदरील राज्य अधिवेशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा तूर्तास स्थगित करण्यात आला असून भविष्यात राज्य शासनाच्या विशेष कर्तव्य राज्य सह पुन्हा घेऊ या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाला आश्वासित केल्याचेही त्यांनी म्हटले.
राज्यात कॉरोनो विषाणू पार्श्वभूमीवर काही लोक जास्त ची भीती पसरवतात ते चुकीचे असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. कारण सध्या सर्वपक्षीय आमदार तसेच राज्याचे सर्व मंत्रिमंडळ देखील अधिवेशनात व्यस्त आहे आणि राज्यशिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनाला मंत्री महोदय आले तर शिक्षकांचे काही प्रश्न मांडता येतात सांगता येतात मार्गी लावता येतात हा त्यामागचा मूळ हेतू असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.
शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आपल्या संघटनेचे कर्तव्य असून आ धिवेशन तूर्तास स्थगित झाल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.