व्यापारी व शेतकर्‍यांना लावला जाणारा वैद्यनाथ फंड रद्द करावा-वसंत मुंडे

आठवडा विशेष|प्रतिनिधी

परळी वैजनाथ:परळी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांना वैद्यनाथ देवस्थान मार्फत लावण्यात येणारा वैद्यनाथ फंड रद्द करावा अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

या बाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन वैद्यनाथ देवस्थान मार्फत शेतकरी व व्यापार्‍यांकडुन वैद्यनाथ फंडच्या नावाखाली मागील 55 वर्षापासुन कर वसुल केला जात आहे. वास्तविक पाहता या कराच्या बदल्यात परळीच्या मार्केट मध्ये असलेल्या व्यापारी व शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पुर्तता केली जात नाही. सध्या परळीत व तालुक्यात भिषण दुष्काळ पडला असुन अशा दुष्काळाच्या परिस्थितीत ही वैद्यनाथ फंडच्या नावाखाली शेतकरी व व्यापार्‍यांकडुन पठाणी वसुली करण्यात येत आहे. अशाप्रकारचा कर कुल्याच महाराष्ट्र राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीने लावला नाही. हा कर देण्यास नकार देताच बाजार समितीचे कर्मचारी व देवस्थानचे विश्‍वस्त लायसन्स रिन्वल वेळेस वसुली संदर्भात अवमान कारक वागणुक देत असतात यामुळे बाजार समितीने शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना लावण्यात येणारा हा वैद्यनाथ फंड रद्द करावा अशी मागणी काँग्रसेच ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *