औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवकाला बेदम मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा,कंकराळा येथील घटना

सोयगाव(औरंगाबाद):ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खासदार निधीतील मंजुरी असलेल्या सभामंडपाचे देयकापोटी धनादेश का काढत नाही असा जाब विचारत पिता पुत्रांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरुवारी कंकराळा ता.सोयगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात ग्रामसेवक मारहाण आणि शासकीय कामात अडथळा या कलमाखाली पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सदरील ग्रामसेवक सभामंडपाच्या कामात धनादेश काढण्यासाठी हेतुपुरस्कर त्रास देवून कमिशनपोटी दहा हजार रु.लाच मागत असल्याची तक्रार रवी पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांचेकडे केली आहे.यामुळे या प्रकरणात रंग चढला आहे.
कंकराळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे हे गुरुवारी कार्यालयात कामकाज करत असतांना रवी पाटील व सागर पाटील यांनी ग्रामसेवकाला सभामंडपाच्या देयकाबाबत जाब विचारला असता ग्रामसेवक यांनी धनादेश देण्याबाबत कुचराई केल्याचा आरोप रवी पाटील यांनी करून ग्रामसेवकास बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा गुन्हा रजी.क्र-२८\२०२० ३५३,३३२ या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती.या प्रकारामुळे कंकराळा गावात खळबळ उडाली होती यामुळे काहीकाळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान पोलिसांनी तातडीने गावात धाव घेत तणाव निवळला.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,शिवदास गोपाळ,विकास लोखंडे,अविनाश बनसोडे,संदीप चव्हाण,सुभाष पवार,आदि पुढील तपास करत आहे.