औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: शहरातील प्रलंबित समस्या न सोडविल्यास नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

सोयगाव:आठवडा विशेष टीम―
शहरातील प्रलंबित समस्यांचा निपटारा न झाल्यास नगर पंचायतीला मोर्चा काढून कुलूप ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.ता.२० मार्चला कुलूप ठोकण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोयगाव शहरात अनेक समस्या अद्यापही प्रलंबित आहे.यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांड पाण्याची विल्हेवाट लावणे,जिल्हा परिषद शाळेजवळील नळीवर ढापा बसविणे,विठ्ठल नगर येथील पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली काढणे,मुख्य चौकांचे सुशोभीकरण आदि समस्या प्रलंबित असून याकडे नगर पंचायतीचे लक्ष वेधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ता.२० मार्चला जुना बाजार चौक ते नगर पंचायत या रस्त्यावरून भव्य मोर्चा काढून नगर पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे,निवेदनावर राजेंद्र अहिरे,रवी काळे,राजेंद्र काळे,शशिकांत काळे,राजू दुतोंडे,प्रमोद पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.