बीड जिल्हा

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात जयदत्त धस पर्वाला सुरुवात

➡ मतदारसंघात एकच हवा जयदत्त धस सारखा युवा आमदार हवा

आठवडा विशेष|गणेश शेवाळे
पाटोदा: आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघात युवा नेतृत्व जयदत्त धस यांनी कार्यक्रत्याचे जाळे निर्माण केले असुन आष्टी मतदारसंघात असे एक गाव नाही तेथे जयदत्त धस यांचा समर्थक नाही त्यामुळे प्रत्येक गावातील सुखदुःखाची घटना त्यांना माहिती होतात यामुळे सर्वात आदी सुखदुखात मदतीला धाऊन येणारे आष्टी मतदारसंघातील युवा नेतृत्व म्हणून जयदत्त धस यांच्या कडे पाहिले जाते यामुळे आष्टी मतदारसंघात नव्या पर्वाला सुरुवात झाली असुन आष्टी मतदारसंघाच्या इतिहासात एवढ्या कमी वयात मतदारसंघातील प्रत्येक गोष्टींचा अभ्यास व जास्त संपर्क असलेला युवानेता म्हणून जयदत्त धस यांच्या कडे पाहिले जाते. मागील काही वर्षात अनेक युवानेते चर्चेत आले आणि कधी मावळले हे त्यांना ही पता नाही पण गेली दहा ते बारा वर्षा पासुन बारा महिने चोवीस तास जनतेच्या सुख दुखात मदतीला धावुन जयदत्त धस जात आहेत यामुळे आष्टी मतदारसंघात एकच हवा येणाऱ्या निवडणूकीत जयदत्त धस सारखाच युवा आमदार हवा असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे यामुळे आष्टी मतदारसंघात जयदत्त धस पर्वाला सुरूवात झाली आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.