बीड जिल्हाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयकविशेष बातमीसामाजिक

बीड तालुक्यातील पिंपरनई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेल्या रस्त्याचे वाजले बारा

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील पिंपरनई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेल्या रस्त्याची अवस्था गंभीर स्वरूपाची झाली आहे.संबंधित ठेकेदार शिव कन्स्ट्रक्शन & कार्यकारी अभियंता बेदरे महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे रस्ता काम करत शासनाची फसवणूक केली आहे.त्यामुळे संबधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड मार्फत मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य व पालकमंत्री बीड यांच्या कडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बेलेश्वर ते बांगरवाडा रस्ता एकुण लांबी 5.60,की.मी.असुन त्यात 5.4,की.मी., डांबरी करुन आणि 0.20 की.मी. सिमेंट रस्ता करण्यात आला.अंदाजे कींमत 2 कोटी ,50 लाख रुपये.
परंतु 4 महिन्यात या सिमेंट रसत्यावरील खडी उखडली आहे. सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा नाली तयार केली नाही.
दाभाडे वस्ति समोर मधेच मोठा खड्डा असून रस्ता न केल्याने अपघातात वाढ झाली आहे. वरील प़करणी संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री ,ग्रामविकासमंत्री सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री बीड यांना दिले आहे.