अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समितीच्या वतीने अंबाजोगाईत प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन ; नामवंत व्याख्यात्यांची हजेरी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षीही प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीहरी नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.15 मार्च रोजी संपन्न झाली. या बैठकीत प्रारंभी समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी मागील वर्षाचा जमाखर्चाचा अहवाल सादर केला.बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होवून सर्वानुमते त्यास मान्यता देण्यात आली.यावर्षी 14 एप्रिल 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांना पाचारण करून त्यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.यात सध्याचा ज्वलंत विषय असलेले शाहीनबाग आंदोलन,अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षांनिमित्त व्याख्यान,माणगाव परिषद संदर्भात व्याख्यान आणि मूकनायक शताब्दी वर्षांनिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील व्याख्यानमाला एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नामांकीत व्याख्यात्यांना निमंत्रीत करून प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या विषयावर ही सदर बैठकीत चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले.या बैठकीला समितीचे डॉ.श्रीहरी नागरगोजे (अध्यक्ष),ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.एस.के.जोगदंड, लंकेश वेडे(कार्याध्यक्ष), भगवानराव ढगे (सचिव),प्रा. गौतम गायकवाड (सहसचिव), अ‍ॅड.मीर महाजेर अली उस्मानी, संभाजीराव सातपुते,व्यंकट वेडे, सुखदेव भुंबे,एकनाथ टोनपे, विजयाताई कांबळे,रामेश्‍वर खाडे,प्रा.अनिल नरसिंगे,प्रा.पी. वाय.फुलवरे,प्रा.किरणकुमार धिमधिमे,रामराव आडे,कविराज कचरे तसेच पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य यांची उपस्थिती होती.बैठकीचे प्रास्ताविक समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समितीचे कार्याध्यक्ष लंकेश वेडे यांनी मानले.