अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

दीनदयाळ बँकेच्या वार्षिक स्नेह मेळाव्यात महिलांचा सन्मान

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दीनदयाळ बँकेचे कार्य-अध्यक्षा शरयुताई हेबाळकर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बँकींग क्षेत्रात प्रगती करत असतानाच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक बँक म्हणुन काही तरी योगदान असावे.या हेतुने दीनदयाळ बँकेच्या वतीने वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.

शहरातील भगवंत सभागृह येथे शनिवार,दि.14 मार्च रोजी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा शरयुताई हेबाळकर तर व्यासपीठावर अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचनाताई मोदी,उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी दिपप्रज्ज्वलन करून मान्यवरांनी भारतमाता व पंडीत दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर सौ.प्रतिक्षा जोशी व सौ.लाटकर यांनी प्रार्थना सादर केली.सुंदरा कोंपलवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिभा गोस्वामी यांनी सांगितले की,बँक मागील तीन वर्षांपासुन हा उपक्रम आयोजित करते. महिलांचा परस्परांशी संवाद व्हावा,त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांचा सन्मान करावा हाच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदु आहे.यावेळी रूपाली शिंदे,राठोड मॅडम यांनी सत्कार सत्राचे सुत्रसंचालन केले.यावेळी मुख्याध्यापिका वर्षा मिलींद चौधरी,पोलीस उपनिरिक्षक सुचिता माधवराव शिंगाडे, पोलीस उपनिरिक्षक मनिषा बालासाहेब लटपटे,पोलीस उपनिरिक्षक मोनाली पोपट पवार,वाहतुक निरिक्षक सुषमा राहुल घुले,नायब तहसिलदार स्मिता सुभाष बाहेती,प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी,प्रा.डॉ.सुनिता बिराजदार,परिचारीका रागिणी देविदास पवार,प्रा.अरूंधती पाटील,मुख्याध्यापिका जमुना हरिसिंग राठोड, उपमुख्याध्यापिका अलका वामनराव सोळंके, मुख्याध्यापिका स्वरूपाताई संतोष कुलकर्णी,मंदाकीनी गित्ते,अ‍ॅड.मंदाकीनी जोशी यांचा बँकेच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी वर्षाताई चौधरी, मनिषाताई लटपटे,प्रा.अरूंधती पाटील,मंदाकिनी गित्ते,सुषमा घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले. यावेळी रेणूका नामदेव चाटे या तीन वर्षीय चिमुकलीने गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.या प्रसंगी बोलताना उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे यांनी महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरूषांच्या बरोबरीने कार्य करीत असल्याचे सांगुन कुटुंबाने महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन केले.तर बँकेच्या अध्यक्षा शरयुताई हेबाळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभार मानले.हा उपक्रम बँकेतील महिला कर्मचार्‍यांच्या सातत्यपुर्ण योगदानामुळे होत आहे. महिलांशी हितगुज व गप्पा गोष्टीच्या माध्यमातून वार्षिक स्नेह मेळाव्यातून त्यांचा परस्परांशी संवाद व्हावा,याच गप्पा टप्पा,हितगुज,स्पुर्तीपुर्ण, आत्मविश्‍वासाची वृद्धी करणार्‍या व्हाव्यात हाच विधायक हेतु असल्याचे त्यांनी यावेळी नमुद करून उपस्थित महिलांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी योगेश्‍वरी नुतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्त्री सन्मानाचे महत्व पटवुन देणारे कवी भागवत मसने लिखीत समुहगीत सादर केले.बँकेच्या प्रगतीचा अहवाल व सांख्यकीय माहिती सुंदरा कोंपलवाड यांनी उपस्थितांना दिली.शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.तर उपस्थितांचे आभार ज्योती गोंदगे यांनी मानले.या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रांतील महिला तसेच बँकेच्या महिला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.