औरंगाबाद जिल्हाक्राईमविशेष बातमीसोयगाव तालुका

सोयगाव : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी शेतकऱ्याकडून १००० रुपयांची लाच घेणारा सोयगाव तहसील कार्यालयाचा लिपिक चतुर्भुज

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
ढालशिंगी (ता.जामनेर जी. जळगाव ) येथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याची सोयगाव तालुक्यातील हिंगना शिवारात शेती आहे. सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी शेतकऱ्याकडून १००० रुपयांची लाच घेणारा सोयगाव तहसील कार्यालयाचा राम रघुनाथ मूरकुटे (लिपिक) यास मंगळवारी (दी.१७) लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. या प्रकारामुळे तहसील कार्यालयात एकच खलबळ उडाली आहे.
तहसील कार्यालयाचे लिपिक राम मुरकुटे यांनी सातबाऱ्यावर तक्रारदार यांचे व त्यांचे भावाचे नाव सातबाऱ्यावरून कमी केले होते ते परत लावण्यासाठी या पूर्वी चुकीचे पत्रक देण्यात आले होते.त्या वेळी तक्रारदार यांचे कडून ५०० रु घेतले होते व पुन्हा पत्रक दुरुस्ती करून देण्यासाठी १००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना सोयगाव तहसील कार्यालयाचे लिपिक राम रघुनाथ मुरकुटे यास मंगळवारी (दी.१७) दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
तक्रारदार शेतकरीरा.ढालसिंगी,ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद. ह.मु.भवानीनगर,जालना️ यांना सोयगाव तहसील कार्यालयाचा लिपिक राम रघुनाथ मुरकुटे (वय ४२) यांनी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर तक्रारदार यांचे व त्यांचे भावाचे नाव सातबाऱ्यावरून कमी केले होते ते परत लावण्यासाठी लाचेची १००० रूपयांची मागणी केली होती.
या कामी पूर्वी मुरकुटे यांनी ️लाचेचे त्या वेळी तक्रारदार यांचे कडून ५०० रु घेतले होते व पुन्हा पत्रक दुरुस्ती करून देण्यासाठी १००० रुपये लाचेची मागणी करून १००० रुपये पंचासमक्ष मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारली. या प्रकरणी -अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि. औरंगाबाद. जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. औरंगाबाद एस ओ अधिकारी रविंद्र निकाळजे पो उप अधीक्षक ला. प्र. वि जालना यांच्या मार्गदर्शन नात सापळा अधिकारी- सापळा अधिकारी- एस.एस.शेख,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. जालना, यांनी यशस्वी सापळा रचुन कारवाई केली असून पुढील तपास चालू आहे.