बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

लिंबागणेशकरांचे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन संपन्न―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―शासन दरबारी नोंद झालेल्या पहील्या सामुहीक शेतकरी आत्महत्या साहेबराव करपे त्यांच्या पत्नी मालतीताई आणि ४ मुले स्मृतीदिनानिमित्त डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश येथिल ९ वर्षापुर्वी आत्महत्या ग़स्त शेतकरी संतोष जाधव यांची आई कमलबाई , मुलगा ओंकार आणि मुलगी नंदिनी यांच्यासह इतर कीसानपुत्र लाक्षणिक उपोषणाला बसले होते.त्यांनी शेतक्यांच्या वाढत्या आत्महत्याविषयी चिंता व संकटात सापडलेल्या शेतक्याविषयी सहवेदना व्यक्त केली.
१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण जि.यवतमाळ येथिल शेतकरी साहेबराव करपे याने त्यांची पत्नी मालतीताई व ४ अपत्यासह आत्महत्या केली होती.ही शेतक -याची पहिली सामुहीक आत्महत्या मानली जाते.साहेबराव करपे यांनी मरण्यापुवी एक चिठ्ठी लिहीली होती.त्यात त्यांनी शेतक्-यांच्या दुदंशेकडे सरकारचे लक्ष वेधले होते.शेतक-यांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे.

कीसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते मा.अमिर हबिब यांनी २०१७ साली साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण यवतमाळ येथुन या उपवास उपक्रमाची सुरुवात केली.दुस- यावर्षी ज्या दत्तपुरला आत्महत्या केली तिथे उपोषण केले.तिस-यावषीं दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधिचे दर्शन घेऊन राजघाट येथे केले. यावर्षी म्हणजेच ४ थ्या वर्षी पुण्यात महात्मा फुले यांच्या वाडयाला भेट देऊन राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहेत. शासनाला वेळोवेळी ज्ञात केलेले खालिल शेतकरी विरोधी कायदे १) सिलिंगचा कायदा २) आवश्यक वस्तु कायदा ३) जमिन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावे यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी संतोष जाधव यांची आई कमलबाई , मुलगा ओंकार ,मुलगी नंदिनी यांच्यासह उपसरपंच शंकर वाणी , ग़ा.पं.सदस्य गणेश लिंबेकर , कीसान सभेचे सुनिल भोसले , नुर सय्यद , रफीक सय्यद , आयुब सय्यद ,शेख अख्तर , सुंदर जाधव , आस्रबा तागड , सचिन आगवान , अक्षय तांदळे आदि.कीसानपुत्र आंदोलक उपस्थित होते.