औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयकसोयगाव तालुका

सोयगाव: कंकराळा गावात बिबट्या अवतरला,रावेरी शिवारात गायीवर हल्ला

सोयगाव(औरंगाबाद) दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील रावेरी शिवारात पहाटेच्या वेळी शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून गाईला जागेवरच ठार केले.
कंकराळा येथील शेतकरी भागवत दशरथ पाटील यांच्या रायरी शिवारात गट नं २१ मधील शेतात ही घटना घडली.माहिती मिळताच वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला.वनरक्षक भिका पाटील,व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान या घटनेमुळे रावेरी शिवारातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.