औरंगाबाद: सोयगावात आरोग्य यंत्रणा सतर्क ,खोकल्याचा प्रतिबंधित औषध साठा नसल्याने मात्र गोंधळ

सोयगाव,ता.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात आरोग्य विभाग २४ तास सतर्क झालेला असून मात्र खोकल्यावरील प्रतिबंधित औषध साठ्याचा तुटवडा असल्याने खोकल्याच्या रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहे.सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागात खोकल्याची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे,परंतु औषध मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.
सोयगाव तालुक्यात अचानक बदललेल्या वातावरणाने खोकल्याच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे.दिवसाचे चटकनारे उन आणि रात्रीची थंडी यामुळे नागरिकांचे धोक्यात आले आहे.त्यातच जिल्हाभर कोरोना व्हायरस बाबतची होत असलेली जनजागृती यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून त्यासाठी तालुका आरोग्य विभाग २४ तासांसाठी सतर्क झाला आहे.मात्र खोकल्याच्या औषधीचा तालुकाभर तुटवडा भासत असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे.

औषधी साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीतही खासगी आरोग्य सेवेहा आधार घ्यावा लागत आहे.कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हास्तरावरून यंत्रणा हालचाली सुरु झाल्या असतांना आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाभर कलागु झालेला आहे,जिल्हा प्रशासन सर्व बाबींच्या अभ्यासातून उपाय योजना हाती घेत असतांना मात्र ग्रामीण भागात औषधी साठा बाबत मात्र निर्णय घेण्यात येत नाही.