लिंबागणेश येथिल कैकाडी समाजातील वस्तीमध्ये अखेर सिमेंट रस्ता व सिमेंट नाल्या बांधण्यात आल्या―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे कैकाडी समाजातील २५ घरे असुन मतदान १०० च्या जवळ आहे.त्यांच्या वस्तीमधे रस्ते आणि सीमेंट नाल्या बांधण्यात आल्या नसल्यामुळे सांडपाणी घराभोवती साचत असल्याने रोगराईला मोठ्या प्रमाणावर आमंत्रण असे त्यामुळे हगवण, टायफाईड , मलेरिया , पोटाचे , त्वचेचे विकार यात वाढ झाली होती.
या प्रकरणी वार्ड मधिल ग्रा.पं.स.बाबासाहेब गायकवाड यांच्यासह डॉ.गणेश ढवळे यांनी सरपंच स्वप्निलभैय्या गलधर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येऊन रस्ता व नाली बांधकामाची मागणी करण्यात आली होती.

अखेर कैकाडी समाजाला सिंमेंट रस्ते नाली मिळाली

कीत्येक वर्षांपासून वंचित राहिलेल्या कैकाडी समाजातील वस्ति मध्ये सरपंच स्वप्निलभैय्या गलधर यांनी तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी दिलेल्या २५- १५ या निधितुन कैकाडी समाजातील वस्तीला सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले.

नविन सरकारने विकास कामात खोडा घातला― सरपंच स्वप्निल गलधर

पंकजाताई मुंढे यांनी ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, नाल्या ; मागासवगीर्य समाजातील लोकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.त्यातील २५-१५ निधीतून कैकाडी समाजातील वस्तिला सिमेंट रस्ते & सिमेंट नाल्या बांधण्यात आल्या आहेत.परंतु या नविन सरकारने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना खोडा घालण्याचा निर्णय घेतला पंकजाताई यांनी मंजुरी दिलेल्या कामासाठीचा निधि व कामे रद्दबातल ठरवली आहेत.

विकसनशील गावातील मंजूर निधी परत जाऊ देणार नाही त्यासाठी व्यापक आंदोलन उभारू―डॉ.गणेश ढवळे

पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी २६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन त्यातील काही कामे पुर्ण झाली आहेत.परंतु महाआघाडीच्या सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत निषेधार्ह असुन राजकीय व्देषापोटी घेतलेल्या निर्णयामुळे विकसनशील गावांचा विकासाचा मार्ग खुंटला आहे.यासंबंधी सकारात्मक निर्णय बदल केला नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालय पासुन आझाद मैदान मुंबई पयंत व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असे लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , सामाजिक न्याय मंत्री व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी बीड मार्फत दिले आहे.