ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशैक्षणिक

शिक्षण विभाग राज्य समन्वय समितीच्या निवेदनामुळे केंद्रप्रमुख प्रवासभत्ता प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामविकास विभागाची कार्यवाही सुरू

राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांची माहिती

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या राज्यातील केंद्रप्रमुख प्रवास भत्त्याच्या प्रशश्नावर मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, राज्य समन्वय समितीचे राज्यसमन्वयक तथा राज्य प्रवक्ते किशोरपाटील कुंझरकर,उपाध्यक्ष बबनराव आटोळे समताशिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरूण जाधव,राज्य महासचिव तथा राज्य प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर उर्द्श शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष इल्लाजोद्दीन फारूकी या पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष चर्चा करून प्रवास भत्ता देण्या संदर्भात आग्रह धरला.
तसेच औरंगाबाद येथे समता शिक्षक संघाच्या11-12-13 येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेच्या आयोजन करण्यासाठी शिष्टमंडळ आधारे तारीख घेते वेळी शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनादिलेल्या निवेदनात राज्यातीलकेंद्रप्रमुख यांना प्रवासभत्ता देण्याबाबत मागणी करून चर्चा केली मा.मंत्री महोदयांनी निवेदनावर शेरा मारून कार्यवाही करण्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे. (सदरील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यअधिवेशन कोरोना मुळे पुढे ढकलेले आहे)फक्त महाराष्ट्र राज्य समताशिक्षक संघाच्या अधिवेशन पत्रकात प्रवासभत्ता मागणी केली आहे हे लक्षात घ्यावे.
ग्रामविकास विभाग मंत्री महोदयांचे PS पाटील साहेब यांनी प्रवासभत्ता संदर्भात टिपण्णी तयार करण्यासाठी संबधित कक्ष अधिकारी यांना दिले.

राज्यसमन्वय समिती व केंद्रप्रमुख संघ तसेच समता शिक्षक संघाच्या सामायिक प्रयत्नामुळे
प्रवासभत्ताप्रश्न सुटण्याची खात्री निर्माण झाली आहे असे राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे व राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर आणि सर्व पदाधिकारी यांनी म्हटले