सोयगाव आगाराला सात लाखाचा फटका – कोरोना विषाणू परिणाम

सोयगाव,ता.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपाय योजना हाती घेण्यात येत असतांना सलग तिसऱ्या दिवसाच्या बंदमुळे सोयगाव आगाराच्या दोन दिवसापासून सर्व फेऱ्या रद्द असल्याने दोन दिवसात सोयगाव आगाराला तब्बल सात लाखांचा भुर्दंड बसला असल्याची माहिती आगार प्रमुख हिरालाल ढाकरे यांनी दिली.
सोयगाव आगाराच्या प्रतिदिन दहा हजार किमी अंतराचे बसफेऱ्या होतात,परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासून सोयगाव आगाराच्या बस फेऱ्या रद्द करण्यात येवून आगाराच्या सर्वच बसेस आपत्कालीन वैद्यकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आल्याने आगाराच्या उत्पन्नात सात लाखाचा भुर्दंड बस्कला आहे.प्रवाशांनीही धास्ती घेतल्याने बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी पाठ फिरविली असून सोयगाव तालुक्यातील अठरा गावातील बसस्थानके ओस पडल्याचे चित्र आहे.

सोयगाव आगार सज्ज-

सोयगाव आगाराच्या सर्व बसेस व कर्मचार्यांना जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन कर्मचारी म्हणून घेतल्याने कोरोना विषाणूचा संघर्ष करण्यासाठी सोयगाव आगार सज्ज झाले असून आगाराच्या सर्व बसेस सदोष करून उभ्या असल्याचे आगार प्रमुख हिरालाल ढाकरे यांनी सांगितले.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील वातानुकुलीत बसेस सोयगाव आगारात वापस आणण्यात आल्या असून या बसेस मध्ये विदेशी पर्यटकांचा झालेला प्रवास आणि त्यांचा बसेसच्या भागाला झालेला स्पर्श याचा धोका लक्षात घेवून सोयगाव आगार प्रशासनाने विदेशी पर्यटकांचा धोका लक्षात घेता बसेस स्वच्छतेची मोहीम सोमवारी हाती घेतली आहे.त्यामुळे या अजिंठा लेणीतील वातानुकुलीत बसेस स्वच्छ झाल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग टळला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Previous post राज्यातील व देशातील जनतेची शिस्त आणि राज्य व केंद्र शासनाचे प्रयत्न यातून देश कोरोणावर नक्कीच मात करेल ; किशोर पाटील कुंझरकर
Next post अंबाजोगाई: राजकिशोर मोदी मिञ मंडळाने केली पोलिस बांधव आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था