अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

अंबाजोगाई: राजकिशोर मोदी मिञ मंडळाने केली पोलिस बांधव आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील
राजकिशोर मोदी मिञ मंडळाचे कार्यकर्ते सज्जन निवृत्तीराव गाठाळ यांचे पुढाकाराने अंबाजोगाई शहरातील पोलिस बांधव आणि स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी सोमवार, दिनांक 23 मार्च रोजी
भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

येथील राजकिशोर मोदी मिञ मंडळ हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.सढळ हस्ते समाजातील गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासतात. वृक्षारोपण,रक्तदान शिबिर, मोफत पाणी पुरवठा,गुणवंत विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप,परीसर स्वच्छता अभियान आदी समाजाभिमुख उपक्रम राबवतात हे उपक्रम राबविण्यासाठी मिञ मंडळाला बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभते.सामाजिक कार्यकर्ते व राजकिशोर मोदी यांचे विश्वासू सहकारी सज्जन निवृत्तीराव गाठाळ यांच्या वतीने व राजकिशोर मोदी मिञ मंडळाचे पुढाकाराने कोरोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस बांधवांसाठी भोजनाची तसेच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची सोय करण्यात आली. रविवारी जनता कर्फ्युच्या दिवशी ही बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना कु.नंदिनी सज्जन गाठाळ व सज्जन गाठाळ यांनी पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था केली होती. कोणतीही आपत्ती निर्माण झाली की,पोलिस बांधवांना बंदोबस्त हा नित्याचाच असतो.ऊन,वारा, पाऊस या कसल्याही संकटाची तमा न बाळगता,ते बंदोबस्तासाठी तैनात असतात. सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत बाहेर गावावांहून मोठ्या प्रमाणात पोलिस बांधव आले आहेत. तसेच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्णांचे नातेवाईक यांनाही सहकार्य व्हावे या विधायक भूमिकेतून आणि सर्व बाजारपेठा व हॉटेल ठप्प असल्याने पोलिस बांधवांची आणि रूग्णांचे नातेवाईक आदींची गैरसोय दूर करण्यासाठी राजकिशोर मोदी मिञ मंडळाचे कार्यकर्ते सज्जन गाठाळ यांनी पुढाकार घेतला. त्यानी पोलिसांच्या व रूग्णांच्या नातेवाईक यांची भोजनाची पूर्ण व्यवस्था केली आहे.रविवारी ही जनता कर्फ्युच्या दिवशी त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाणी व चहाची व्यवस्था केली होती.याकामी कार्यकर्ते सज्जन गाठाळ यांना राजकिशोर मोदी मिञ मंडळाचे कार्यकर्ते राणा चव्हाण,सुनील व्यवहारे,विजय रापतवार,शेख मुख्तार,अजिम जरगर,प्रशांत शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Back to top button